Indian Science Congress : पंतप्रधानांचे प्रमुख सल्लागार देणार पहिले व्याख्यान; नीता अंबानी होणार सहभागी
या वर्षी, ISC थीम 'महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान' आहे. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, नीता अंबानी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास संमती दिली आहे.
![Indian Science Congress : पंतप्रधानांचे प्रमुख सल्लागार देणार पहिले व्याख्यान; नीता अंबानी होणार सहभागी Prime Ministers Chief Advisor will deliver the first lecture in Indian science congress Nita Ambani will be a presentS Indian Science Congress : पंतप्रधानांचे प्रमुख सल्लागार देणार पहिले व्याख्यान; नीता अंबानी होणार सहभागी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/7fa55fdd53d7ad369d622f983a0900321672391587586440_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
RTMNU News : 108 व्या इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या पहिल्या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय कुमार सूद (Ajay Kumar Sood) व्याख्यान सादर करणार आहेत. 3 ते 7 जानेवारी दरम्यान इंडियन सायन्स कॉंग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रा. सूद हे 'तंत्रज्ञान क्रांती' या विषयावर पहिले व्याख्यान देणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर दुपारी 2.30 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसर, अमरावती रोड येथील फार्मसी हॉलमध्ये हे सत्र होणार आहे.
या सत्रात एसआरएम विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डी. नारायण राव हेही उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे डॉ. रविचंद्रन, सचिव, पृथ्वी विज्ञान मंत्रालय हे देखील 'ब्लू इकॉनॉमिक पॉलिसी' या विषयावर आपले विचार मांडतील. यासोबतच भारतातील जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. राजेश गोखले हे देखील 'बायो मॅन्युफॅक्चरिंग' या विषयावर भाषण करतील. सीएसआयआरचे महासंचालक डॉ. एन. कलैसेल्वी हे 'इंडिया अॅट 2030' या विषयावर समारोप सत्रात मार्गदर्शन करतील. विशेष म्हणजे नोबेल पारितोषिक विजेते अॅडा योनाथ आणि फ्रेझर स्टॉडार्ड यांसारखे शास्त्रज्ञही या परिषदेत सहभागी होत आहेत.
नीता अंबानी उपस्थित राहणार
यावर्षी, भारतीय विज्ञान काँग्रेसची थीम 'महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान' होती. त्यामुळे महिलांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर यात चर्चा होणार आहे. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, नीता अंबानी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास संमती दिली आहे. त्याचवेळी त्यांची सुधा मूर्ती यांच्याशी चर्चा सुरु आहे.
महाराष्ट्र सरकारही यजमानपद भूषवणार
नुकतीच विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च शिक्षण विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत सायन्स काँग्रेसच्या संदर्भात बैठक घेतली. त्यात नागपूर विद्यापीठासह राज्य सरकारही या कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचवेळी सायन्स काँग्रेसमध्ये विदर्भाशी संबंधित 25 विविध प्रकारची मॉडेल्स दाखवण्यात येणार आहेत.
कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सायन्स काँग्रेसची धुरा
विद्यापीठावर इंडियन सायन्स काँग्रेसच्या आयोजनाची जबाबदारी आहे. अशावेळी संपूर्ण विद्यापीठ त्यात व्यस्त आहे. बहुतांशी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर त्याचा भार आहे. त्यामुळे विद्यापीठाची मोठी कसोटी लागणार असल्याचे दिसून येत आहे.
ही बातमी देखील वाचा...
Indian Science Congress : नागपुरात 49 वर्षांनंतर प्रथमच 'इंडियन सायन्स काँग्रेस'; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)