पंतप्रधानांच्या कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमात पतंजलीची भूमिका प्रमुख, स्थानिकांना रोजगार देण्याला प्राधान्य : आचार्य बाळकृष्ण
Patanjali Mega Food and Herbal Park Nagpur : नागपूरमधील (Nagpur) मिहान सेझ (SEZ) मध्ये 'पतंजली'च्या (Patanjali) मेगा फूड अँड हर्बल पार्कचे (Food and Herbal Park) येत्या 9 मार्चला उद्घाटन होणार आहे.
Patanjali Mega Food and Herbal Park Nagpur : नागपूरमधील (Nagpur) मिहान सेझ (SEZ) मध्ये 'पतंजली'च्या (Patanjali) मेगा फूड अँड हर्बल पार्कचे (Food and Herbal Park) येत्या 9 मार्चला उद्घाटन होणार आहे. पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे एमडी आचार्य बाळकृष्ण (Acharya Balkrishna) यांनी आज याबाबतची माहिती दिली. या प्रकल्पासाठी मनुष्यबळ कौशल्ये तयार केली जात आहेत. स्थानिक लोकांना रोजगार देणे हे आमचे प्राधान्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमात पतंजलीची भूमिका प्रमुख असल्याचेही आचार्य बाळकृष्ण म्हणाले.
आमच्या उत्पादनांचा दर्जा उच्च आहे. संपूर्ण जागतिक बाजारपेठ आमच्यासाठी खुली आहे. देशातील जनतेला निर्यात दर्जाची उत्पादने देणे हे आमचे प्राधान्य असल्याचे आचार्य बाळकृष्ण म्हणाले. काही प्रतिभावान व्यक्ती आपल्याही नजरेसमोर आहेत. स्थानिक लोकांना रोजगार मिळवून देणे आणि शेतकरी समृद्ध करणे हे आमचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही या प्रदेशातील शेतकरी आणि कृषी व्यवस्थेची स्थिती सुधारण्याचे वचन देत असल्याचे बाळकृष्ण म्हणाले. आज या भागातील जवळपास प्रत्येक गावातील प्रत्येक शेतकरी आमच्या संपर्कात असल्याचे ते म्हणाले.
देशात मनुष्यबळ कौशल्य विकसित केले जाणार
पतंजलीचा प्रकल्प स्थापन करण्यासाठी खूप वेळ आणि मेहनत घेतली आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात अनेक अडथळे आले, पण शेवटी आम्ही ते पूर्ण करू शकलो. पंतंजली पंतप्रधान मोदींच्या कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे स्वप्न साकार करण्यासाठी अग्रणी भूमिका बजावत आहे, ज्याद्वारे देशात मनुष्यबळ कौशल्य विकसित केले जात असल्याचे आचार्य बाळकृष्ण म्हणाले.
गुणवत्तापूर्ण उत्पादने निर्यात करण्याला प्राधान्य
आचार्य बाळकृष्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्लांटमध्ये आधुनिक मानकांवर आधारित संपूर्ण प्रगत प्रणाली आहे. ज्यामध्ये पॅकेजिंग लाइन, टेक्नोपॅक ते प्रगत संशोधन प्रयोगशाळा समाविष्ट आहेत. आमच्या उत्पादनांची गुणवत्ता उच्च दर्जाची आहे. संपूर्ण जागतिक बाजारपेठ आमच्यासाठी खुली आहे. परंतु देशातील जनतेला सर्वोत्तम निर्यात दर्जाची उत्पादने उपलब्ध करुन देणे हे आमचे प्राधान्य आहे. कच्च्या मालाच्या उपलब्धतेनुसार संत्रा, लिंबू, आवळा, डाळिंब, पेरू, द्राक्षे, करवंद, गाजराचा रस, आंबा आणि संत्र्याचा लगदा आणि कांदा-टोमॅटोची पेस्टही येथे तयार केली जाणार असल्याची माहिती आचार्य बाळकृष्ण यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या:























