नागपूर अवैध पार्टी प्रकरणी कारवाईचा सपाटा; पार्टीकडे दुर्लक्ष केल्यानं पोलीस निरीक्षकांची बदली, 2 पोलीस निलंबित
Nagpur Rave Party : नागपुरात अवैध पार्टीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकांची बदली आणि दोन पोलीस निलंबित. फार्म हाऊसमधील पार्टीत शेकडो तरुण, तरुणी सहभागी.
Nagpur Rave Party : नागपुरात काही दिवसांपूर्वी एका रेव्ह पार्टीचं आयोजन झाल्याचं समोर आलं होतं. पोलीस उपायुक्त गजानन राजमाने रात्रपाळीवर असताना त्यांना या पार्टीबद्दल माहिती मिळाली आणि त्यांनी तात्काळ त्याठिकामी छापा घातला. त्यावेळी एक नाही, दोन नाही, तर तब्बल दोन ते तीन हजार तरुण-तरुणी यावेळी उपायुक्तांना नशेत बेधुंद होऊन नाचताना दिसले. पोलिसांनी धाड टाकत पार्टीतील मद्यसाठी आणि इतर वस्तू जप्त केल्या होत्या. तसेच, नागपुरातील अवैध पार्टीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.
बेकायदेशीरित्या झालेल्या या पार्टीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. नागपूर वर्धा रोडवरील जामठाजवळ एका खासगी फार्म हाऊसमध्ये ही पार्टी झाली. पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी रविवारी रात्री तिथं छापा टाकला होता. शेकडो तरुण-तरुणी दारुच्या नशेत झिंगत असल्याचं आढळलं होतं. पोलिसांनी तिथं मोठ्या प्रमाणात मद्यसाठाही जप्त केला. या पार्टीत अनेक नियम धाब्यावर बसवले गेले होते. या पार्टीकडे दुर्लक्ष केल्यानं पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता 2 पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.
नियमबाह्य पार्टीकडे दुर्लक्ष केल्या प्रकरणी 2 पोलिसांचे निलंबन
रविवारी रात्री नागपूर वर्धा रोडवरील जामठाजवळ एका खाजगी फार्म हाऊसवर झालेल्या पार्टी प्रकरणी संबंधित हिंगणा पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्या दिवशी नाईट राऊंडवर असलेल्या पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्री त्या खाजगी फार्म हाऊसवर धाड टाकली होती. तेव्हा त्या ठिकाणी शेकडो तरुण-तरुणी दारूच्या नशेत झिंगत असताना आढळले होते.
पोलिसांनी ट्रॉपिकल अफेयर नावानं सोशल मीडियावर प्रमोशन करून आयोजित केलेल्या त्या पार्टीच्या आयोजकांविरोधात विनापरवानगी तसेच रात्री दहा वाजल्यानंतरही डीजे लावून नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच पार्टीमधून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा ही जप्त केला होता. घटनेच्या दिवशीच नियम बाहेर पार्टीकडे दुर्लक्ष करण्याच्या आरोपाखाली हिंगणा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांची तडकाफडकीनं बदली करण्यात आली होती. तर आता दोन पोलिसांचं निलंबनही करण्यात आलं आहे.