Nagpur Metro : सोमवारपासून सकाळी 6.15 ते रात्री 10 पर्यंत चालणार मेट्रो सेवा
दिवसाची पहिली फेरी 6.15 वाजता असेल तर, शेवटची मेट्रो ट्रेन (Metro Train) रात्री 10 वाजता उपलब्ध असेल. वाढीव फेऱ्यांप्रमाणे नवीन वेळापत्रक 12 सप्टेंबर पासून म्हणजे सोमवार पासून लागू होणार आहे.
नागपूर : नागरिकांची सातत्याने होणारी मागणी बघता तसेच शाळा, महाविद्यालय शिक्षण किंवा इतर कामांकरिता घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. या वाढलेल्या प्रवाशांची संख्या लक्षात घेत महा मेट्रो नागपूरने ऑरेंज लाईन (कस्तुरचंद पार्क स्टेशन ते खापरी मेट्रो स्टेशन) आणि ऍक्वा लाईन (सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन) वर धावणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये देखील वाढ केली आहे.
या वाढीव फेऱ्यां दिनांक 12 सप्टेंबर (सोमवार) पासून ऑरेंज आणि ऍक्वा लाईन (Aqua Line) वर सुरु होणार असून या अंतर्गत प्रवासी सेवा सकाळी 6.15 वाजेपासून चारही खापरी, कस्तुरचंद पार्क, सिताबर्डी (Sitabuldi) इंटरचेंज, लोकमान्य नगर (Lokmanya Nagar) स्थानकांवरून सुरु होणार आहे. दिवसाची पहिली फेरी 6.15 वाजता असेल तसेच सुधारित वेळापत्रकानुसार या दोन्ही मार्गिकेवरील टर्मिनल स्टेशन येथून शेवटची मेट्रो ट्रेन (Metro Train) रात्री 10 वाजता उपलब्ध असेल. वाढीव फेऱ्यांप्रमाणे नवीन वेळापत्रक 12 सप्टेंबर पासून म्हणजे सोमवार पासून लागू होणार आहे.
शहरात वाढलेल्या ट्रॉफिकमुळे मेट्रोला पसंती
शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या ट्रॉफिकमुळे शहरातील अनेक भागात नागरिकांना बराच वेळ वाहनांच्या रांगेत उभे राहावे लागते. तर दुसरीकडे नागपूर महानगरपालिकेच्या बसेसही अनेक मार्गांवर फुल्ल असल्याने सोयीस्कर प्रवासासाठी नागपुरकरांकडून मेट्रोला पसंती देण्यात येत आहे. याठिकाणी सोयीस्कर प्रवासासह मेट्रोच्या प्रत्येक स्थानकावर पार्किंगची (Parking) व्यवस्था आदी असल्याने कोणत्याही स्टेशनवरुन दळणवळण करणे नागरिकांना सोयीचे होत असल्याने गेल्या काही महिन्यांमध्ये प्रवासाठी संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.
शालेय विद्यार्थ्यांना दिलासा
शहरात मेट्रोची कनेक्टिव्हीटी वाढली आहे. तसेच कोरोना काळानंतर शाळा-महाविद्यालय पुन्हा ऑफलाईन सुरु झालेल्या असल्याने मोठ्या संख्येत विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी मेट्रोचा वापर करतात. त्यामुळे सकाळी अनेक विद्यार्थी सायकल घेऊन मेट्रोने प्रवास करत असल्याचे दिसून येते. शिवाय मेट्रोच्या फेऱ्याही वाढल्याने आरामदायक प्रवासाचा अनुभव नागपूरकरांना मिळत आहे.
OBC Scholarship : ओबीसी विद्यार्थ्यांची परराज्यातील शैक्षणिक शिष्यवृत्ती बंद, संविधान चौकात निदर्शने
सोमवारी जिल्हास्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धा
नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त जिल्हा क्रीडा अधिकारी (Sport Officer) कार्यालय व जी. एच रायसोनी ग्रुप नागपूर यांचे संयुक्त विद्यामाने जिल्हास्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी 12 सप्टेंबर 2022 पर्यंत प्रवेश अर्ज पाठवावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे. 15 ते 24 सप्टेंबर जी.एच रायसोनी हिंगणा, एमआयडीसी पोलीस स्टेशन (MIDC Police Station) नागपूर येथे फुटबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, फुटसल, हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबलटेणीस या खेळाच्या स्पर्धा होतील.