Nagpur Accident : ओव्हटेक करण्याची चूक नडली, भावासोबत परीक्षेला जाताना बहिणीचा मृत्यू; नागपुरातील अपघाताने हळहळ
Nagpur Sister Accident : नागपुरात दुचाकीवरून जाणाऱ्या बहीण-भावाचा अपघात होऊन त्यामध्ये बहीणीला जीव गमवावा लागला आहे.
नागपूर: ओव्हटेक करण्याची एक चूक नडली अन् भावासोबत परीक्षेला जाताना बहिणीचा दुर्देवी अंत झाला. नागपुरात हा धक्कादायक अपघात घडला असून त्यामुळे संपूर्ण शहर हादरुन गेलंय. मनाला चटका लावणारी ही घटन नागपुरातील बेसा परिसरात घडली. नेमका हा अपघात कसा घडला? चूक कुणाची होती? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
चूक नडली, घात झाला
अपघातात मरण पावलेल्या या तुरुणीचं नाव आहे प्रियंका मानकर, ती 26 वर्षांची होती. प्रियंका बँकिंग परीक्षेची तयारी करत होती. 3 ऑगस्ट रोजी तिची परीक्षा असल्यानं ती आपला भाऊ योगेशसोबत परीक्षा केंद्रावर जात होती. बेसा परिसरातील संचेती शाळेत तिचं परीक्षा केंद्र होतं.
दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास मनीषनगरमधून बेसाकडे जाताना योगेशने पुढे जात असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान समोरून एक बोलेरो गाडी येत होती. त्यामुळे योगेशची भंबेरी उडाली आणि निघण्याचा कोणताही मार्ग नसल्याने योगेशने जोरात ब्रेक दाबला.
गाडीवरचा ताबा सुटला, बहीण ट्रकखाली गेली
आधीच गाडीचा वेग होता त्याच करकचून ब्रेक दाबल्याने योगेशचा गाडीवरील ताबा सुटला. गाडीसह बहीण-भाऊ खाली पडले अन् प्रियंका ट्रकच्या चाकाखाली सापडली. प्रियंकाचा जागीच मृत्यू झाला तर योगेश थोडक्यात बचावला. सुदैवाने योगेशनं हेल्मेट घातलेलं होतं. मात्र या अपघातात योगेश गंभीर जखमी झाला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये ट्रक आणि बाईक अतिशय संत गतीने जात असताना योगेशने अचानक ब्रेक लावल्याने बाईक पडल्याचं दिसतय. हा अपघात निष्काळजीपणे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात झाल्याचं बोललं जातयं. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
ही बातमी वाचा: