Wardha News : धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरचा भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर जखमी
Wardha Accident News : वर्धा शहरातून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. यात ऑटो आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला असून या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
Wardha Accident News वर्धा : वर्धा शहरातून अपघाताची (Accident News) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. वर्ध्यात (Wardha News) ऑटो आणि कंटेनरचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर तीन जण गंभीर जखमी असल्याचे देखील बोलले जात आहे. वर्ध्याच्या पूलगाव नजीकच्या केळापूर येथे ही घटना घडलीय. तर अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथक आणि एक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आहे. पोलीस पुढील कायदेशीर प्रक्रिया करत असून गंभीर जखमींवर सावंगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
4 जणांचा जागीच मृत्यू,तर तीन जण गंभीर जखमी
प्राथमिक माहितीनुसार, अपघातातील ऑटो हा वर्ध्यावरून पूलगावच्या दिशेने जात होता. दरम्यान, समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने ऑटोला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, या धडकेत जागीच ऑटो मधील 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. ही धडक दिल्यावर कंटेनर चालक आणि इतर व्यक्ति हे घटना स्थळावरून पसार झाल्याची माहितीही पुढे आली आहे. दुर्गा मेशराम, सतीश नेहारेसह इतर दोन व्यक्तिचा यात मृत्यू झाल्याची प्रथमिक माहिती पुढे आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा घटनास्थळीचं मृत्यू
कोंबड्यांची वाहतूक करणारी महिंद्रा पिकअप वाहन आणि दुचाकीमध्ये समोरासमोर भीषण धडक झालीय. या अपघातात एका तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झालाय. तर, अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या चिचोली येथे घडली. मृतक आणि त्याचे दोन मित्र असे तिघे एका दुचाकीवरून तुमसरकडून गोबरवाहीकडं जात होते. याचवेळी कोंबड्यांचं वाहन गोबरवाहीकडून तुमसरकडं भरधाव निघाला होते. या दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली. गंभीर तरुणांवर तुमसर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर आकाश मरस्ककोल्हे असं मृतकाचे नाव आहे. या घटनेचा अधिक तपास सध्या तुमसर पोलीस करीत आहेत. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या