एक्स्प्लोर

OBC : कुणबी आणि तेली संघटनांनंतर आता माळी महासंघ मैदानात, मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र न देण्याची मागणी

मराठ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र देण्याचे प्रयत्न करण्यात येऊ नये आणि त्यासाठी सात सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला जीआर रद्द करण्यात यावा अशी मागणी माळी महासंघाने केली आहे.

नागपूर : मराठा समाजाला कुणबी (Kunbi) म्हणून प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला कुणबी आणि तेली समाजानंतर आता माळी समाजाने (Mali) ही तीव्र विरोध दर्शवला आहे. सरकारने असे केल्यास माळी समाज राज्यभर तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा माळी महासंघाकडून देण्यात आला आहे. मराठा समाजाचे आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) स्थापन केलेल्या नारायण राणे समिती आणि नंतरच्या न्या. गायकवाड आयोगाच्या अहवालानंतरही सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचा आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण मान्य केलेलं नाही, न्यायिकदृष्ट्या तो सिद्ध करता आलेला नाही. त्यामुळे मराठ्यांना सरसकट कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्याच्या प्रयत्न केला जाऊ नये असा इशारा माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी दिला आहे. 

मराठ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र देऊ नये : माळी महासंघ

कुणबी आणि मराठा समाज एकच आहेत असे मत 2012 च्या नारायण राणे आयोग तसेच नंतरच्या न्या. गायकवाड आयोगाच्या अहवालात मांडण्यात आले होते. त्याच्या पुष्टीसाठी काही ऐतिहासिक पुरावे ही जोडण्यात आले होते. मात्र तेव्हा दोन्ही समाज वेगवेगळे आहेत, यासाठी त्यांचा वेगळेपण सिद्ध होईल असे पुरावे जाणून-बुजून त्या अहवालांमध्ये जोडण्यात आले नव्हते. म्हणूनच कुणबी आणि मराठा समाज एकच आहेत हे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात सिद्ध होऊ शकले नाही. त्यामुळे आता मराठ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र देण्याचे प्रयत्न करण्यात येऊ नये आणि त्यासाठी सात सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला जीआर रद्द करण्यात यावा अशी मागणीही माळी महासंघाने केली आहे.

ओबीपी प्रतिनिधींशी चर्चा का नाही : बबनराव तायवाडे 

दुसरीकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे (OBC Mahasangh) राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सोमवारपासून अन्नत्याग आंदोलनावर बसण्याची घोषणा केली आहे. मराठा प्रतिनिधींसोबत राज्य सरकार रोज चर्चा करत आहे मात्र ओबीसी प्रतिनिधींसोबत  राज्य सरकारने अजून कुठलीही चर्चा केली नाही. त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघ राज्य सरकारवर नाराज आहे. राज्य सरकार म्हणते की ओबीसी अंतर्गत मराठ्यांना आरक्षण देणार नाही, मात्र कुणबी प्रमाणपत्राचे काय? मनोज जरांगेची मागणी पूर्ण झाली तर सरसकट मराठे ओबीसीमध्ये येतील, याबद्दल राज्य सरकार आमच्यासोबत बोलत नसल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नाराजी आहे, असं बबनराव तायवाडे यांनी सांगितलं.

हेही वाचा

Maratha Reservation: सरसकट जात बदलण्याचा अधिकार नाही, सरकारनं ती चूक करू नये; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा इशारा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Election Commission : शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mega Bailgada Sharyat: '2 Fortuner, 2 Thar, 7 ट्रॅक्टर देऊ', चंद्रहार पाटील यांची घोषणा, 5 लाख शेतकरी जमणार
Unseasonal Rains: 'जवळजवळ दोन लाख रुपयांचं नुकसान झालंय', Thane जिल्ह्यातील शेतकऱ्याची व्यथा
Chembur School : 'आम्ही फक्त शिस्तीचं पालन करायला सांगितलं',चेंबूरमधील St. Anthony School चं स्पष्टीकरण
MPSC Success Story: 'अभ्यास करुन अधिकारी होणं रॉकेट सायन्स नाही', topper Pratik Parvekarचं युवकांना आवाहन
Leopard Conflict: 'नरभक्षक बिबटे Gujarat च्या Vantara मध्ये पाठवणार', वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Election Commission : शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
Maharashtra Elections : दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
गोपीनाथ मुंडेंची खरी वारस मीच, ना भाऊ-ना बहिणी फक्त करुणा वहिनी; करुणा शर्मांची अजित पवारांवरही कडवी टीका
गोपीनाथ मुंडेंची खरी वारस मीच, ना भाऊ-ना बहिणी फक्त करुणा वहिनी; करुणा शर्मांची अजित पवारांवरही कडवी टीका
निवडणुका पुढे ढकलल्या असत्या तर काय बिघडलं असतं? निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मी समाधानी नाही : संजय गायकवाड
निवडणुका पुढे ढकलल्या असत्या तर काय बिघडलं असतं? निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मी समाधानी नाही : संजय गायकवाड
राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर; निवडणूक आयोगाचे 10 महत्त्वाचे मुद्दे
राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर; निवडणूक आयोगाचे 10 महत्त्वाचे मुद्दे
Embed widget