(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे कोरोना पॉझिटिव्ह
नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लक्षणं नसली तरी नियमानुसार आयसोलेट केल्याचं मुंढे यांनी सांगितलं.
नागपूर : नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरद्वारे ही माहिती दिली. तसंच माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याची विनंतीही त्यांनी केली.
"माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मला कोणतीही लक्षणं नाहीत, पण नियमानुसार मी स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मी विनंती करतो की, मागील 14 दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करावी. नागपूरमधील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी मी घरातूनच काम करत आहे. आपण नक्कीच जिंकू," असं तुकाराम मुंढे यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
Dear All, I have tested positive for #COVID19. I am asymptomatic and have isolated myself as per the protocol & guidelines.Request everyone who have come in my contact for last 14 days to get tested. I am Working from Home to control #pandemic situation in Nagpur. We shall win
— Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) August 25, 2020
नागपुरातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी अनेक कठोर पावलं उचलली. परिणामी लोकप्रतिनिधींसह व्यापारी वर्गाने त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी मुंढे यांनी अनेक मास्टरप्लॅन केले आहेत. तसंच कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बेड उपलब्ध व्हावेत आणि या रुग्णांची कोणतीही लुटमार होऊ नये यासाठी तुकाराम मुंढे यांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे.
संबंधित बातम्या