जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
Debtor countries of the world : जगावरील कर्जाचा बोजा सातत्याने वाढत आहे. जगातील देशावरील कर्ज हे 102 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे. हे कर्ज खूप मोठ्या प्रमाणात आहे.
Debtor countries of the world : जगावरील कर्जाचा बोजा सातत्याने वाढत आहे. जगातील देशावरील कर्ज हे 102 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे. हे कर्ज खूप मोठ्या प्रमाणात आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या हवाल्याने कर्जदार देशांची यादी शेअर केली आहे. यामध्ये अमेरिकेवर सर्वाधिक कर्ज आहे, तर चीन आणि जपान दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारताबद्दल बोलायचे झाले तर जगातील एकूण कर्जाच्या 3.2 टक्के कर्जाचा वाटा भारतावर आहे.
कर्जाच्या बाबातीत जगात अमेरिका आघाडीवर
अमेरिका हा सर्वात मोठा कर्जदार देश आहे, जर आपण वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने जाहीर केलेल्या आकडेवारी पाबिली तर सध्या जगावर एकूण 102 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज आहे. त्यात सर्वात जास्त कर्ज हे अमेरिकेवर आहे. अमेरिकेवर 36 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज आहे. जे जागतिक कर्जाच्या 34.6 टक्के आहे.
ड्रॅगनची अवस्थाही बिकट आहे. चीन हा जगातील दुसरा सर्वात मोठा कर्जदार देश आहे. जर आपण चीनच्या कर्जाबद्दल बोललो तर चीनवर 14.69 ट्रिलियन डॉलर्सचे प्रचंड कर्ज आहे. जे संपूर्ण जगाच्या कर्जाच्या 16.1 टक्के आहे.
अमेरिकेनंतर चीन आणि जपानचा नंबर
कर्जाच्या बाबतीत अमेरिका आणि चीननंतर जपान तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयएमएफच्या मते, जगातील एकूण कर्जांपैकी 10 टक्के कर्ज जपानवर आहे. अहवालानुसार, ते सुमारे 10.80 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढले आहे. कर्जाच्या बाबतीत ब्रिटन (UK) चौथ्या क्रमांकावर आहे. जे जागतिक कर्जाच्या 3.6 टक्के आहे. याशिवाय फ्रान्स पाचव्या क्रमांकावर आहे. या देशावर कर्जाचा वाटा हा 3.5 टक्के आहेत तर इटली कर्जाच्या बाबातीत सहाव्या क्रमाकांवर आहे. कर्जाचा वाटा हा 3.2 टक्के आहे.
कर्जाच्या बाबतीत भारत सातव्या क्रमांकावर
कर्जाच्या बाबतीत भारत सातव्या क्रमांकावर आहे. टॉप-10 यादीत भारतावर अमेरिकेपेक्षा 10 पट कमी कर्ज आहे. जगातील एकूण कर्जामध्ये भारताचा वाटा 3.2 टक्के आहे. यानंतर जर्मनी (2.9 टक्के), कॅनडा (2.3 टक्के), ब्राझील (1.9 टक्के) यांचा समावेश आहे. तर जीडीपी गुणोत्तराच्या दृष्टीने पाहिले तर कर्जदार देशांची ही यादी खूपच वेगळी दिसेल.
दरम्यान, भारतीयांवर देखील दिवसेंदिवस कर्जाचा बोजा वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामीणसह शहरी भागातील (Rural and Urban Areas) जनता कर्जाच्या विळख्यात अडकली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील प्रमाण शहरी भागापेक्षा जास्त आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी आहेत.
महत्वाच्या बातम्या: