एक्स्प्लोर

तुकाराम मुंढेंबाबत मुख्यमंत्री ठाकरेंचं महत्वाचं वक्तव्य, म्हणाले...

तुकाराम मुंढे हे नाव समोर आलं की एक डॅशिंग अधिकारी, नेहमी चर्चेतलं नाव. आता तुकाराम मुंढे यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांनी देखील महत्वाचं वक्तव्य केलं आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुलाखतीत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पाठिशी तुम्ही आहात का? असा प्रश्न विचारला.

मुंबई : तुकाराम मुंढे हे नाव समोर आलं की एक डॅशिंग अधिकारी, नेहमी चर्चेतलं नाव. आता तुकाराम मुंढे यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांनी देखील महत्वाचं वक्तव्य केलं आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुलाखतीत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पाठिशी तुम्ही आहात का? असा प्रश्न विचारला आला तेव्हा त्यांनी त्याचं उत्तर हो असं दिलं. मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी तुकाराम मुंढे नागपूरमध्ये लावत असलेल्या शिस्तीबाबत प्रश्न विचारला. तेव्हा शिस्तप्रिय तुकाराम मुंढेंच्या पाठिशी मी आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, नागपूर महापालिका विरुद्ध तुकाराम मुंढे यांचा वाद सगळ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. एखादा अधिकारी कठोर आणि कडक शिस्त पालन करणारा असू शकतो. तुकाराम मुंढे यांनी लोकहिताचे निर्णय घेतले. नागपूरमध्ये त्यांनी एक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी घेतलेले निर्णय जर काही लोकांना पटत नसतील त्यांनी हे लक्षात घ्यावं की तिथे आता निवडणुकीचा जमाना नाही. मतदार वाचले तर मतदान होईल हे लक्षात घ्यावं. अशा सगळ्या वातावरणात तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्याने जर एखादी गोष्ट अमलात आणली तर अशा अधिकाऱ्याच्या पाठिशी उभं राहिलंच पाहिजे. आततायीपणा कुणीही करु नये. पण एक चांगली शिस्त जर लावली जात असेल आणि जनतेचं हित त्यामध्ये साधलं जात असेल तर मी तुकाराम मुंढेंच्या पाठिशी आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी तुकाराम मुंढे यांची पाठराखण केली आहे. हेही वाचा- सरकार तीन चाकी असलं तरी स्टिअरिंग माझ्याच हाती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या निर्णयांबाबत नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे नगरसेवकांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेत असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. तुकाराम मुंढे फोन उचलत नाहीत, भेटायला गेल्यास बाहेर उभं ठेवतात अशा देखील तक्रारी त्यांच्या संदर्भात झाल्या होत्या. महत्वाचं म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तुकाराम मुंढे यांची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयात पत्र पाठवून केली होती. कालच्या भागात काय म्हणाले मुख्यमंत्री ठाकरे  'मी लॉकडाऊन उघडतो, लोकं मृत्यूमुखी पडली तर जबाबदारी घ्याल का?' : मुख्यमंत्री ठाकरे  ... म्हणून मी मंत्रालयात जात नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'एकच शरद सगळे गारद' ही शरद पवारांची मुलाखत गाजल्यानंतर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत घेतली आहे. संजय राऊत यांनी घेतलेली ही मुलाखत काल 25 आणि आज 26 जुलैला प्रसारित झाली. पाहा संपूर्ण मुलाखत शरद पवार यांच्या मुलाखतीतील महत्वाच्या बातम्या भाजपनेच राष्ट्रवादीला सत्तेसाठी विचारणा केली होती, फडणवीसांच्या गौप्यस्फोटांमध्ये तथ्य नाही : शरद पवार पाकिस्तान नाही तर चीन आपला सर्वात मोठा शत्रू : शरद पवार  लॉकडाऊनबाबत कठोर भूमिका घेतली नसती तर न्यूयॉर्कसारखी अवस्था झाली असती : शरद पवार Sharad Pawar | सत्तेचा दर्प चालत नाही, लोक पराभव करतात; शरद पवार यांचा फडणवीस यांना टोला शिवसेना नसती तर भाजपचा आकडा 105 नाही 40-50 असता : शरद पवार 'सरकारचे हेडमास्तर की रिमोट कंट्रोल?', संजय राऊतांच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tahawwur Rana : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
Donald Trump Ends Birth right Citizenship : डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarane Protest : मनोज जरांगेंचं सराटीत सातवं आमरण उपोषण,  सराटीत परिस्थिती काय?Narendra Chapalgaonkar Passes Away:माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकरांचं निधनसकाळी ८ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 25 January 2025Thane Station Washroom : कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे थेट शौचालय बंद, ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tahawwur Rana : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
Donald Trump Ends Birth right Citizenship : डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
Taxi -Auto Fare Hike : टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
Walmik Karad Beed: वाल्मिक कराडची सर्व मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली, एसआयटीने डेटा काढला, कोर्टात परवानगीचा अर्ज
मोठी बातमी: वाल्मिक कराडला 'मकोका'पेक्षा मोठा झटका; एसआयटी सर्व मालमत्ता जप्त करण्याच्या तयारीत
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात, अंतरवाली सराटीत आजपासून आमरण उपोषण, सरकारचं टेन्शन वाढणार?
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात, अंतरवाली सराटीत आजपासून आमरण उपोषण, सरकारचं टेन्शन वाढणार?
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तीन दिवसांचा ब्लॉक, वाहतुकीत कोणते बदल होणार?
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तीन दिवसांचा ब्लॉक, वाहतुकीत कोणते बदल होणार?
Embed widget