मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड
Bangladeshi youths in Solapur : सोलापुरात अनधिकृत पद्धतीने राहणाऱ्या तीन बांगलादेशी तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे बांगलादेशी मोहोळ तालुक्यातील चिंचोली एमआयडीसी येथे काम करत होते.
Bangladeshi youths in Solapur : सोलापुरात अनधिकृत पद्धतीने राहणाऱ्या तीन बांगलादेशी तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मोहोळ तालुक्यातील चिंचोली एमआयडीसी येथे काम करणाऱ्या तीन बांगलादेशी तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. दहशतवाद विरोधी पथक सोलापूर युनिट आणि मोहोळ पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे.
मोहोळ तालुक्यातील चिंचोली एमआयडीसी येथे विनापरवाना राहत होते
मोहोळ तालुक्यातील चिंचोली एमआयडीसी येथे विनापरवाना तीन बांगलादेशी तरुण राहत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलीस पथकाने बांगलादेशी तरुणांकडे पासपोर्ट, व्हिजा यांच्यासह भारतात राहण्यासाठी लागणाऱ्या परवानगीचे कागदपत्र मागितले असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे आढळून आली नाहीत. या बांगलादेशी तरुणांकडे बनावट आधार कार्ड आढळून आले. सोलापुरातील एजंट कडून आधार कार्ड बनवून घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चंचल विष्णुदेव उर्फ विश्वनाथ रॉय उर्फ पहन, हुजूरअली हुसेन, मीनल शनिचेरा टुडू राहणार कटला जिल्हा दिनासपुर, बांग्लादेश असे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी तरुणांची नावे आहेत. मोहोळ पोलीस ठाण्यात परकीय नागरिक कायद्याच्या विविध कलम अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एटीएस पथकाची जालन्यात मोठी कारवाई
एटीएस पथकानं जालन्यात देखील मोठी कारवाई केली आहे. जालना जिल्ह्यात बांगलादेशी व्यक्तींवर कारवाई केली आहे. एटीएस आणि जालना पोलिसांनी कारवाई केली आहे. जालन्यातील पारद पोलिसांची कारवाई करत तीन बांगलादेशी व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या बांगलादेशी व्यक्तींची पोलिसांकडून झाडाझडती सुरु आहे.
मागील चार दिवसाखालीच धुळे जिल्ह्यातून देखील बांगलादेशी तरुणांना पोलिसांनी अटक केली
दरम्यान, मागील चार दिवसाखालीच धुळे जिल्ह्यातून देखील बांगलादेशी तरुणांना पोलिसांनी अटक केली होती. शहरातील हॉटेल न्यू शेरे पंजाब येथून चार बांगलादेशींना अटक करण्यात आली होती. धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि एटीएसच्या पथकाने ही कारवाई केली होती. यामुळे धुळ्यात एकच खळबळ उडाली आहे गेल्या दोन दिवसांपूर्वी धुळे शहरात ब्लँकेट विकण्याच्या बहाण्याने बांगलादेशी आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी ही करवाई केली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा सोलापुरात तीन बांगला देशी युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महंमद मेहताब बिलाल शेख (48) शिल्पी बेगम महंमद बेताब शेख (43, मुळ रा. चरकंदी पो. निलुखी पोलीस ठाणे सिपचर जि.महिदीपुर, बांगलादेश), ब्युटी बेगम पोलस शेख, (45, मुळ रा. बेहेनातोला पोलीस ठाणे सिपचर, जि.महिदीपुर बांगलादेश) आणि रिपा रफीक शेख (30 वर्ष, मुळ रा. श्रीकृष्णादी पो. कबीरस्पुर पोलीस ठाणे, राजुर जि. महिदीपुर बांगलादेश) हे चार बांगलादेशी नागरिक लॉजवर आढळून आले होते.
महत्वाच्या बातम्या: