एक्स्प्लोर
लहान मुलांनी एकमेकांवर पाणी फेकल्याच्या वादातून नागपुरातील हॉटेलमध्ये राडा
एकेमकांवर पाणी फेकल्याच्या वादातून नागपुरातील सेंटर पॉईट हॉटेलमध्ये एका मुलाच्या वडिलांनी त्यांच्या नातेवाईकांसह प्रचंड राडा घातला आहे.
नागपूर : लग्न सोहळ्यात खेळताना नऊ वर्षांच्या लहान मुलांनी एकेमकांवर पाणी फेकल्याच्या वादातून नागपुरातील सेंटर पॉईट हॉटेलमध्ये एका मुलाच्या वडिलांनी त्यांच्या नातेवाईकांसह प्रचंड राडा घातला आहे. पोलिसांनी या प्रकरणी व्यावसायिक गौरव तुली आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे तुली आणि त्यांच्या नातेवाईकांनी सेंटर पॉईंट हॉटेल परिसरात घातलेल्या राड्यातील काही सीसीटीव्ही दृश्य एबीपी माझाच्या हाती लागली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 16 फेब्रुवारीला कोराडी येथील 'अमरिन फॉर्म' मध्ये एक लग्न सोहळा होता. त्या सोहळ्यात खेळताना नऊ वर्ष वयोगटातील मुले एकमेकांवर पाणी फेकत होते. त्यामध्ये इंदूरमधून लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या मन्नू साहनी यांच्या मुलाने गौरव तुली यांच्या मुलाच्या अंगावर पाणी टाकले. त्यावरून अमरीन फार्म येथेच लग्न सोहळ्यात वाद झाले. तिथे मोठ्यांच्या मध्यस्तीनं तो वाद तिथं निवळला होता.
मन्नू साहनी यांनी त्यांच्या मुलाच्या कृत्याबद्दल माफी ही मागितली होती. मात्र, त्यानंतर गौरव तुली आणि त्यांचे काही नातेवाईक यांनी मन्नू सहानी थांबलेल्या सेंटर पॉईंट हॉटेलमध्ये धाव घेतली आणि बेकायदेशीररित्या हॉटेलमध्ये प्रवेश करून हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये थाबंलेल्या साहनी यांना धक्काबुक्की करत मारहाण केली.
पोलिसांचा म्हणणे आहे की यावेळी त्यांना थांबवायला आलेल्या हॉटेल व्यवस्थापनाला ही तुली आणि त्यांच्या सहकार्यांनी मारहाण केली. हॉटेलच्या बाहेर सुरु असलेल्या धक्काबुक्की आणि मारहाणीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून सीताबर्डी पोलिसांनी गौरव तुली यांच्यासह त्यांच्या पाच नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Nandurbar Accident | नंदुरबारमध्ये गोरक्षनाथ महाराजांच्या यात्रेला जाणाऱ्या भक्तांचा अपघात, दोघांचा मृत्यू, आठ जखमी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement