(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Swine Fle : स्वाईन फ्लू मृत्यूबाबत लपवाछपवी, मृत्यू विश्लेषण समिती थांबली 25 वर, विभागात वाढली संख्या
2009 पासून स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत असताना, या कालावधीत महानगरपालिकेने आपल्या एकाही रुग्णालयात या रुग्णांना भरती करण्याची सोय उभी केली नाही. आता तर मेयोनेही जागा नसल्याचे सांगून हात वर केले आहेत.
नागपूर: कोरोना (Covid) आटोक्यात आला. मात्र स्वाइन फ्लूचा उद्रेक वाढला. मृत्यूदेखील वाढत असून आतापर्यंत स्वाइन फ्लू संशयितांचे पंचेचाळीसपेक्षा अधिक मृत्यू (more deaths) झाले, असताना मृत्यू विश्लेषण समितीच्या (Mortality Analysis Committee) फाईलीमध्ये अद्याप 25 मृत्यूंचीच नोंद झाली आहे. मृत्यूसंख्येबाबतची ही लपवाछपवी असल्याची शंका आता व्यक्त केली जात आहे. मागील दोन महिन्यात समितीच्या केवळ 3 बैठका झाल्या आहेत. यावरून आरोग्य यंत्रणा स्वाइन फ्लूने होणाऱ्या मृत्यूबाबत गंभीर नसल्याची जोरदार चर्चा मेडिकल वर्तुळात आहे.
मनपाकडे यंत्रणाच नाही
मेडिकल आणि एम्स (AIIMS) तसेच खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूबाधितांवर उपचार होत आहेत. महापालिका (nagpur municipal corporation) केवळ आकडेमोड करण्यात अडकली आहे. या साथ आजाराच्या रुग्णांवर उपचार करणारी यंत्रणाच महापालिकेला उभारता आली नाही. त्यातच मृत्यू विश्लेषण समितीची बैठक घेऊन स्वाइन फ्लूच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब करण्याच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारितील कामामध्येही तत्परता नाही. साप्ताहिक बैठक (Weekly Meeting) घेण्याच्या नियमालाही खुद्द समितीकडून हरताळ फासला गेला. 30 ऑगस्ट नंतर 6 सप्टेबंरला बैठक होईल असा विश्वास होता, परंतु मृत्यू विश्लेषण समितीने बैठकच बोलविली नाही. यामुळे स्वाइन फ्लूमुळे दगावलेल्या मृत्यूंवर शिक्कामोर्तब झाले नाही. एकट्या मेडिकलमध्ये (GMC) स्वाइन फ्लूचे सुमारे 33 मृत्यू झाले आहेत. मात्र यापैकी पन्नास टक्केच मृत्यू समितीने नोंदवले आहेत. उर्वरित मृत्यूंची नोंद झाली नाही. एम्समध्येही एक व्यक्ती स्वाइन फ्लूने दगावला आहे. मेयोतही मृत्यू झाले आहेत. मात्र या मृत्यूंवर शिक्कामोर्तब कधी होईल. यापैकी काही मृत्यूंची नोंद झाली.
स्वाइन फ्लूचे 478 रुग्ण
नागपूर शहरात 17, ग्रामीणमध्ये 9 आणि जिल्ह्याबाहेरचे सुमारे 16 मृत्यू झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर मागील 2 महिन्यात स्वाइन फ्लू बाधितांचा आकडा 478 वर गेला आहे. यात शहरातील बाधीतांची संख्या 254 तर,ग्रामीणची संख्या 86 आहे. जिल्ह्याबाहेरील 138 रुग्णांची नोंद आहे. सध्या 124 स्वाइन फ्लू बाधित, 15 स्वाइनबाधित व्हेंटिलेटरवर आहेत.
13 वर्षात मनपाच्या एकाही रुग्णालयात नाही सोय
2009 पासून स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत असताना, 13 वर्षांच्या कालावधीत महानगरपालिकेने आपल्या एकाही रुग्णालयात या रुग्णांना भरती करण्याची सोय उभी केली नाही. आता तर मेयोनेही जागा नसल्याचे सांगून हात वर केले आहेत. यामुळे रुग्णांचा भार एम्स व मेडिकलवर आला आहे. यातही एम्स शहराबाहेर असल्याने सर्वाधिक रुग्ण मेडिकलमध्ये उपचारासाठी येत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या