एक्स्प्लोर

तुकाराम मुंढे विरुद्ध नगरसेवक वाद; काँग्रेस नगरसेवक नागपूर विभागीय आयुक्तांच्या भेटीला

नितीन साठवणे नावाच्या कॉंग्रेसच्या नगरसेवकावर जो महानगरपालिका प्रशासनाने गुन्हा दाखल केला त्यावरून वातावरण पेटले आहे. गुन्हा दाखल झालेले काँग्रेसचे नगरसेवक नितीन साठवणे जेव्हा विभागीय आयुक्त कार्यालयात आले त्यावेळी इतर नगरसेवकांनी चक्क टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं.

नागपूर : नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना होणारा विरोध दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज त्यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी काँग्रेसचे नगरसेवक विभागीय आयुक्त डॉक्टर संजीव कुमार यांना भेटले आणि कारवाईची मागणी केली. काँग्रेस नगरसेवक नितीन साठवणे यांच्यावर जो महानगरपालिका प्रशासनाने गुन्हा दाखल केला त्यावरून वातावरण पेटले आहे.

गुन्हा दाखल झालेले काँग्रेसचे नगरसेवक नितीन साठवणे जेव्हा विभागीय आयुक्त कार्यालयात आले त्यावेळी इतर नगरसेवकांनी चक्क टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. साठवणे हे सतरंजीपुरा म्हणजे ज्याठिकाणी सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण असणाऱ्या कंटेन्मेंट झोनचे नगरसेवक आहेत. एकदा क्वॉरंटाईनमधून आलेल्या लोकांचे अनुभव ऐकल्यामुळे परत इतर लोकांना नेण्यासाठी आलेल्या प्रशासनासाठी लोकांनी घराचे दरवाजेच उघडले नाही. त्यांना वेळ द्या मानसिक तयारी होऊ द्या, असे नगरसेवक नितीन साठवणे यांचे म्हणणे होते. मात्र साठवणे यांचा आरोप आहे की असं म्हटल्यामुळे त्यांच्यावर तुकाराम मुंढे यांच्या आदेशाने सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. खास म्हणजे या नगरसेवकांबरोबर काँग्रेसचे आमदार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि इतर पदाधिकारीही तेथे उपस्थित होते.

महत्वाचे म्हणजे भाजपाशासित महानगरपालिकेत आता मुंढे विरोधात भाजपसह गटातटात वाटली गेलेली काँग्रेसही एक झाली आहे. तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेत आले आणि थोड्याच दिवसात त्यांना विरोध सुरू झाला. पण गेल्या काही दिवसात प्रशासनाच्या विरोधात नागपूरकर जनताही नेत्यांबरोबर रस्त्यावर उतरलेली दिसते आहे.

तुकाराम मुंढेना विरोध

  • 28 जानेवारीला तुकाराम मुंढे यांनी नागपूर मनपाचा चार्ज घेतला.
  • विरोधी पक्ष आणि कॉंग्रेस नेते तानाजी वनवे यांनी तुकाराम मुंढे भेटत नाहीत, यावर आक्षेप घेतला.
  • नंतर हाच सूर भाजप नेता आणि महापौर संदीप जोशी यांनीही गिरवला.
  • कोरोना लॉकडाऊनमध्ये महापौरांनी प्रशासनाची क्वॉरंटाईन पद्धत चुकीची असून रुग्ण त्यामुळे ही वाढू शकतात ही भूमिका घेतली
  • भाजी बाजारांचे वाईट व्यवस्थापन आणि इतर भेटीचे विषय घेऊन नगरसेवक, राजकीय कार्यकर्ते यांची ठिकठिकाणी आंदोलने
  • कोविड हॉस्पिटल आमच्या बिल्डिंगला लागून नको म्हणत केटी नगर नागरिक आणि आमदार विकास ठाकरे रस्त्यावर
  • पाच दिवस आधी हिल रोड आणि पांढराबोडी कंटेन्मेंट झोन विनाकारण जास्त दिवस ठेवत असल्याचा आरोप करत सलग दोन दिवस नागरिक आणि आमदार ठाकरे मुंढेंच्या विरोधात रस्त्यावर
  • काँग्रेस नगरसेवक नितीन साठवणेवर गुन्हा दाखल
  • काल मोमीनपुरा, भागवाघर चौक येथील नागरिक पोलिसांच्या वागणुकीवर नाराज होत रस्त्यावर
  • काल महानगरपालिकेत ऐतिहासिक अशी भाजप-कॉंग्रेसची एकत्र पत्रकार परिषद
  • आज काँग्रेस नगरसेवक विभागीय आयुक्तांकडे दाद मागायला गेले

आज विभागीय आयुक्तांनी नगरसेवकांशी काही प्रभाग निहाय चर्चा करण्याचे आश्वासन दिले. काही भागात क्वॉरंटाईन कंटेन्मेंट झोनमध्ये लोकांच्या संयमाचा बांध तुटला असला तरी त्याला मार्ग नाही.

Protest Against Tukaram Mundhe | नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंविरुद्ध सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! महाराष्ट्रासाठी पुढचे 3 दिवस महत्वाचे, विक्रमी तापमानाची नोंद होणार, हवामान विभागाचा इशारा, काळजी घेण्याचं आवाहन
सावधान! महाराष्ट्रासाठी पुढचे 3 दिवस महत्वाचे, विक्रमी तापमानाची नोंद होणार, हवामान विभागाचा इशारा, काळजी घेण्याचं आवाहन
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेत आणखी 17 आमदार वाढणार; ठाणे, पुणे, सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूरसाठी निवडणुका, पाहा A टू Z माहिती
विधान परिषदेत आणखी 17 आमदार वाढणार; ठाणे, पुणे, सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूरसाठी निवडणुका, पाहा A टू Z माहिती
OBC Reservation Issue : सरकारी बाबूंच्या चुकांमुळे 28 वर्ष हक्काच्या आरक्षणासाठी लढा; ना मनासारखं शिक्षण, ना नौकरी, ओबीसी जातींमधील तरुणांची कैफियत
सरकारी बाबूंच्या चुकांमुळे 28 वर्ष हक्काच्या आरक्षणासाठी लढा; ना मनासारखं शिक्षण, ना नौकरी, ओबीसी जातींमधील तरुणांची कैफियत
India Inflation: महागाईचं संकट, सराफा व्यवसायावरही मोठा परिणाम; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी असोशिएशनच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया, म्हणाले...
भारतावर महागाईचं संकट, सराफा व्यवसायावरही मोठा परिणाम; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी असोशिएशनच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

Rohit Pawar On Sunil Shelke : मी कर्जत जामखेडमधूनच निवडणूक लढवणार! रोहित पवार यांचं स्पष्टीकरण
Rohit Pawar on Sunil Tatkare Praful Patel : सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल भाजपतून लढणार
Mateen Patel Home Demolish : नगरसेवक मतीन पटेल यांच्या घराचं पाडकाम, पालिका अधिकारी काय म्हणाले_
Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : बीडमध्ये पुन्हा क्षीरसागर विरुद्ध पंडित संघर्ष; विकासकामांच्या बैठकीवरून दोन्हीआमदार आमनेसामने
बीडमध्ये पुन्हा क्षीरसागर विरुद्ध पंडित संघर्ष; विकासकामांच्या बैठकीवरून दोन्हीआमदार आमनेसामने
Pune Crime News: पुण्यात घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्....; नेमकं काय घडलं?
पुण्यात घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्....; नेमकं काय घडलं?
ठाणे महापालिकेतील महिला डॉक्टरांची संपवले जीवन, प्रशासनात खळबळ; घराच्या 6 व्या मजल्यावरुन मारली उडी
ठाणे महापालिकेतील महिला डॉक्टरांची संपवले जीवन, प्रशासनात खळबळ; घराच्या 6 व्या मजल्यावरुन मारली उडी
Thalapathy Vijay: तमिळनाडूत AIDMKमध्ये अखेर उभी फूट पडलीच; सरकार स्थापनेत एकेका मतासाठी संघर्ष केलेल्या सीएम विजयना बहुमताच्या चाचणीत तब्बल 25 बंडखोर आमदारांचा पाठिंबा!
तमिळनाडूत AIDMKमध्ये अखेर उभी फूट पडलीच; सरकार स्थापनेत एकेका मतासाठी संघर्ष केलेल्या सीएम विजयना बहुमताच्या चाचणीत तब्बल 25 बंडखोर आमदारांचा पाठिंबा!
Sunil Tatkare And Praful Patel NCP Politics: सुनील तटकरेंनी सुनेत्रा पवारांना तो मेसेज देण्याचा केला प्रयत्न; काल गुवाहाटीवरुन निघताना काय घडलं?, NCP ची इनसाईड स्टोरी
सुनील तटकरेंनी सुनेत्रा पवारांना तो मेसेज देण्याचा केला प्रयत्न; काल गुवाहाटीवरुन निघताना काय घडलं?, NCP ची इनसाईड स्टोरी
आठ वर्षांनंतर ट्रम्प चीन दौऱ्यावर; एलाॅन मस्क, कुकसह तब्बल 17 सीईओंची फौज सुद्धा सोबत; इतिहासातील सर्वात मोठा विमान करार होणार?
आठ वर्षांनंतर ट्रम्प चीन दौऱ्यावर; एलाॅन मस्क, कुकसह तब्बल 17 सीईओंची फौज सुद्धा सोबत; इतिहासातील सर्वात मोठा विमान करार होणार?
रात्री अकराला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट, पुन्हा परत घरी आले अन् पहाटे अखेरचा श्वास; अखिलेश यादवांच्या अवघ्या 38 वर्षीय भावासोबत नेमकं काय घडलं? मृत्यूवर सनसनाटी दावे
रात्री अकराला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट, पुन्हा परत घरी आले अन् पहाटे अखेरचा श्वास; अखिलेश यादवांच्या अवघ्या 38 वर्षीय भावासोबत नेमकं काय घडलं? मृत्यूवर सनसनाटी दावे
NTAचे DG असणाऱ्या IAS सुबोध कुमार सिंह बक्षीस का? NEET पेपरफुटीवर जयंत पाटील भडकले
NTAचे DG असणाऱ्या IAS सुबोध कुमार सिंह बक्षीस का? NEET पेपरफुटीवर जयंत पाटील भडकले
Embed widget