एक्स्प्लोर

CNG : मुंबई, पुण्याच्या तुलनेत नागपुरात 40 रुपयांनी अधिक सीएनजी दर; काय आहे यामागचे गौडबंगाल? 

CNG Price In Nagpur : देशात सर्वात महाग सीएनजीची विक्री ही नागपुरात होत असून गुजरातच्या तुलनेत कधी-कधी हा दर दुप्पट असतो.  

 

नागपूर : राज्यात मुंबई, पुणे आणि इतर शहरांमध्ये सीएनजीचा दर हा 60 ते 65 रुपये प्रती किलोच्या दरम्यान आहे. मात्र नागपूरकरांना याच सीएनजीसाठी शंभर रुपये प्रती किलो द्यावे लागत आहेत. सीएनजीच्या दरात जवळजवळ 40 रुपये तफावत एकाच राज्यामध्ये कशी असू शकते? काय आहे किंमतीच्या पाठीमागचे गौडबंगाल याचा शोध एबीपी माझाने घेतला आहे.

नागपूरच्या वाडी परिसरातल्या एका सीएनजी पंपावर आज 99.99 प्रती किलो म्हणजेच 100 रुपये प्रती लिटर दराने सीएनजी मिळतो आहे. तीन दिवस आधी तर हाच दर 103 रुपये होता. हा देशातला सगळ्यात महागडा सीएनजी असावा. गुजरातमधल्या सीएनजीच्या किमतीच्या तुलनेत तर नागपुरात मिळणाऱ्या सीएनजी ची किंमत ही अनेक वेळा दुप्पट असते. 

सीएनजी किंमत प्रती किलो 

  • नागपूर- 99.99 रुपये
  • मुंबई- 63.50 रुपये
  • पुणे- 63.90 रुपये
  • गुजरात- 64.99 रुपये     
  • दिल्ली- 53.04 रुपये 
  • हैद्राबाद- 69.00 रुपये 

सन 2019 मध्ये नागपूरला पहिला सीएनजी पंप आला. आज शहरात पंपांचा आकडा फार वाढला नाही. एकाचे तीन पंप झालेत. हे तिन्ही पंप रॉमॅट या एकाच उद्योगसमूहाच्या मालकीचे आहेत. नागपूरला एवढा महागडा सीएनजी असल्याचे कारण मात्र हा एकाधिकार नसून नागपुरात शहर गॅस वितरण सुविधा प्रणालीच अस्तित्वात नाही हे आहे. नागपूरला सीएनजीची पाईपलाईनच नाही आणि त्यामुळे सरकारची सबसिडी नाही. या कंपनीला गुजरातच्या धईच येथून एलएनजी मागवावा लागतो. मग त्या एलएनजीचे रूपांतर नागपुरात आणून सीएनजीमध्ये होते आणि मगच हे सीएनजी पंपावर येतं आणि त्याचे वितरण केल्या जातं. 

फक्त शहरातीलच वाहने नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात जाणारी वाहने नागपूर मध्यस्थळी असल्यामुळे येत जात असतात. या सर्व व्यापारालाही महागड्या सीएनजीचा फटका बसतोच. बराच काळ देशातील सर्वात महागडं पेट्रोल व डिझेल घेणाऱ्या नागपूरच्या नागरिकांना आता हे सीएनजी ही एवढे महाग घ्यावे लागत आहे. यातून दिलासा मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे. 

महत्त्वाच्या बातम्या : 

 

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale: सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Ravindra Chavan : सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Embed widget