(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PNG-CNG Price Hike: PNG-CNG दराचा भडका, सीएनजी 2 रुपयांनी महाग तर घरगुती पाईप गॅसचीही दर वाढ
PNG-CNG Price Hike : सीएनजी (PNG), पीएनजी (CNG) दरात पुन्हा एकदा वाढ झालीय.
PNG-CNG Price Hike : सीएनजी (PNG), पीएनजी (CNG) दरात पुन्हा एकदा वाढ झालीय. सीएनजी प्रतिकिलो 2 रुपयांनी महाग झालाय. तर घरगुती पाईप गॅसचे दर प्रति युनिट दीड रुपयांनी वाढलेत. या दरवाढीनंतर सीएनजी 63.50 रुपये किलो असेल तर पीएनजीसाठी 38 रुपये मोजावे लागणार आहेत. या दरवाढीमुळे रिक्षा आणि टॅक्सीचे प्रवासी भाडे वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय.
मुंबईमध्ये काल (17 डिसेंबर) सीएनजीचा दर 61.50 होता तर आजचा (18 डिसेंबर) दर हा 63.50 रूपये आहे. गेल्या 3 महिन्यात चौथ्यांदा ही दर वाढ झाली आहे. मुंबईमध्ये जवळपास 8 लाख लोक आहेत जे CNG वाहनाचा वापर करतात. त्यांना या दरवाढीमुळे फटका बसला आहे.
टॅक्सी चालक आणि ऑटोरिक्षा युनियन आता प्रवासी भाड्यांमध्ये 2 ते 5 रूपयांची वाढ करण्याची मागणी करत आहेत. मुंबईसोबतच लखनऊ, उन्नाव आणि आग्रा येथे देखील सीएनजी आणि पीएनजी दरात वाढ झाली आहे.
आज (18 डिसेंबर) सकाळपासून लखनऊ, उन्नाव आणि आग्रामध्ये CNGची किंमत 72.50 रुपये असून आयोध्यामध्ये 72.95 रुपये किंमत झाली आहे. आत्तापर्यंत CNG ची किंमत इथे 70.50 रुपये होती. लखनऊ आणि आग्रा येथे पीएनजीची किंमत 1 रूपये प्रति स्टँडर्ड क्यूबिक मीटर वाढली असून आता ही किंमत 38.50 रुपये/ स्टँडर्ड क्यूबिक मीटर झाली आहे.
4 डिसेंबर रोजी दिल्लीत झाली होती दर वाढ
इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) या कंपनीने 4 डिसेंबर रोजी दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानमध्ये CNG च्या किमती वाढवल्या होत्या. गॅसच्या दरात वाढ झाल्याने, दिल्लीच्या NCT मध्ये CNG ची किंमत 53.04 रुपये झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Petrol-Diesel Price Today : आजचे इंधन दर, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत
Omicron Variant : सावधान! ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये 'हे' प्रमुख लक्षण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha