मंदिरांजवळील 500 मीटर परिसर मांस, मद्य मुक्त करा; हिंदू जनजागृती समिती आणि मंदिर महासंघाची मागणी
Sale of Non Veg around Temple : मंदिरांच्या 500 मीटर परिसरात मांस आणि मद्य बंदी करण्याची मागणी हिंदू जनजागृती समिती आणि मंदिर महासंघाने केली आहे.
Demand to Ban Sale of Non Veg around Temples : मंदिरांच्या (Temples) 500 मीटर परिसरात मांस (Non-Veg ban) आणि मद्य बंदी (Liquor Ban) करण्याची मागणी हिंदू जनजागृती समिती (Hindu Janajagruti Samiti) आणि मंदिर महासंघाने (Maharashtra Mandir Mahasangh) केली आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) मोठ्या मंदिरांमध्ये भ्रष्टाचार होत आहे, देवाचे दागिने आणि इतर ऐतिहासिक वस्तू गायब होत आहेत, मंदिरांच्या जमिनी (Temple Lands) बळकावल्या जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व मोठे मंदिर (Maharashtra Temples) सरकारी नियंत्रणातून मुक्त करावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समिती (Hindu Janajagruti Samiti) आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने (MaharashtraMandir Mahasangh) केली आहे.
मंदिरांजवळील 500 मीटर परिसर मांस, मद्य मुक्त करा
राज्यातील हिंदू मंदिरांच्या आसपासचा 500 मीटरचा परिसर मद्य आणि मांसमुक्त करण्यात यावा. राज्यात मंदिरांच्या अवतीभवती 200 मीटरपर्यंत मद्य आणि मांस संबंधित व्यवसाय नसावे असा कायदा होता. मात्र हळूहळू 200 मीटरची मर्यादा कमी करून ती 75 मीटर पर्यंत करण्यात आली. आता या मर्यादेत वाढ करून ती 500 मीटरपर्यंत वाढवण्यात यावी, अशी मागणी ही हिंदू जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे. हिंदू जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रदेश समन्वयक अनिल घनवट यांनी एबीपी माझासोबत बोलताना ही माहिती दिली आहे.
4 फेब्रुवारीपासून महाराष्ट्र मंदिर ट्रस्टचे खास अधिवेशन
नागपुरात 4 फेब्रुवारीपासून महाराष्ट्र मंदिर न्यासांचे (ट्रस्टचे) खास अधिवेशन होत असून या अधिवेशनाच्या माध्यमातून ही मागणी सरकार पुढे केली जाणार आहे. हिंदू मंदिर सरकारी नियंत्रणातून मुक्त करताना त्या ठिकाणी भाविकांच्या नियंत्रणाखाली न्यास (ट्रस्ट) स्थापन करून मंदिरांचे योग्य व्यवस्थापन करण्यात यावे आणि मंदिरांशी संबंधित प्रथा परंपरा जपल्या जाव्यात अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे.
महाराष्ट्रात वक्फ बोर्डाचा कायदा रद्द करण्याची मागणी
महाराष्ट्रात (Maharashtra) वक्फ बोर्डाकडे (Waqf Council) तब्बल 97 हजार एकर जमीन असून दरवर्षी त्यात वाढ होत आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनीत (Waqf Board Land) होणारी ही वाढ त्यांच्याकडून हिंदू मंदिरांच्या (Hindu Temple) जमिनी बळकावल्या जात असल्यामुळे होत असल्याचा आरोपही हिंदू जनजागृती समिती (Hindu Janajagruti Samiti) आणि मंदिर महासंघाने केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वक्फ बोर्डाचा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणीही मंदिर महासंघाने केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मंदिर पिकनिक स्पॉट नाही, हिंदू नसलेल्यांना प्रवेश देऊ नये- मद्रास कोर्ट