Cristiano Ronaldo : सौदीत क्लबकडून खेळणाऱ्या रोनाल्डोने इस्लाम धर्माचा स्वीकार केला? त्या व्हायरल फोटोंमागील सत्य काय?
फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. रोनाल्डोने पत्नीसह इस्लामचा स्वीकार केल्याचा दावा करण्यात आला होता.
Cristiano Ronaldo : सौदी अरेबियात अल नास्सर क्लबकडून खेळत असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोचे उमराह केल्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. रोनाल्डोने पत्नीसह इस्लामचा स्वीकार केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, व्हायरल झालेले फोटो एआय जनरेटेड आहेत. त्यामुळे व्हायरल दावा खोटा आहे.
माशाअल्लाह: दुनियां के सबसे मशहूर फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो ने #इस्लाम_धर्म अपनाया और हरम शरीफ में अपनी पत्नी के साथ नमाज़ अदा की...!#SubhanAllah ❤️#mashaallah pic.twitter.com/tO4M2aZYqA
— Rehman Abdul (@RehmanAbdul30) December 22, 2024
लाइटहाऊस जर्नलिझमने पोर्तुगीज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आणि त्याच्या पत्नीचे पांढरे कपडे परिधान केलेले फोटो मिळवले. इतर यूझर्स सुद्धा फोटो शेअर करत आहेत. फोटो पाहून फॅक्ट तपासले असता फोटोंची पार्श्वभूमी अस्पष्ट असल्याचे लक्षात आले. AI द्वारे तयार केलेल्या प्रतिमांमध्ये सहसा मानवी चुका दिसून येतात. एका चित्रात रोनाल्डोला सहा बोटे आहेत. रिव्हर्स इमेज शोधतानाही कोलाजऐवजी वैयक्तिक फोटो सापडले.
माशाअल्लाह: दुनियां के सबसे मशहूर फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो ने #इस्लाम_धर्म अपनाया और हरम शरीफ में अपनी पत्नी के साथ नमाज़ अदा की...!#SubhanAllah ❤️#mashaallah pic.twitter.com/tO4M2aZYqA
— Rehman Abdul (@RehmanAbdul30) December 22, 2024
मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झाच्या दुबईमधील फोटोनी भूवया उंचावल्या
दुसरीकडे, टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्याबाबत अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर अफवा सुरू आहेत. आता अशीच आणखी काही छायाचित्रे समोर आली आहेत, ज्यांनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. मोहम्मद शमीचे सानिया मिर्झासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये दोघे दुबईमध्ये वेळ घालवत असल्याचा दावा केला जात आहे.
Lovely picture of mohammed shami and sania mirza in Dubai 😘 pic.twitter.com/6IKyjIpL4Y
— Reena (@Sonaspark) December 22, 2024
व्हायरल फोटोंचे नेमके सत्य काय?
अलीकडेच सानिया मिर्झाने भारतातील काही शहरांमध्ये कार्यक्रमांना हजेरी लावली. सध्या सानिया अबुधाबीमध्ये वर्ल्ड टेनिस लीगमध्ये व्यस्त आहे. दुसरीकडे मोहम्मद शमी काही दिवसांपूर्वी देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसला होता. शमी पूर्णपणे तंदुरुस्त असून मैदानात परतण्याची तयारी करत आहे.
AI च्या मदतीने तयार केलेले फोटो
व्हायरल छायाचित्रे आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने बनवण्यात आली आहेत, ज्यामध्ये खऱ्या आणि नकलीमध्ये थोडा फरक आहे. या फोटोंचा सत्याशी अजिबात संबंध नाही.
इतर महत्वाच्या बातम्या