Fact Check : हार्दिक पांड्यानं WTC साठी रोहित शर्माला हटवण्याची मागणी केलीच नाही,फेक फोटो व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Fact Check : हार्दिक पांड्याने रोहित शर्मा ला कर्णधार पदावरुन हटवण्याची मागणी करणारं वक्तव्य केलेलं नाही. एक खोटं वक्तव्य हार्दिक पांड्याच्या नावानं व्हायरल केलं जात आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी सुरु आहे. दोन्ही संघ मालिकेत बरोबरीवर आहेत. या दरम्यान सोशल मीडियावर हार्दिक पांड्याच्या नावानं एक खोटी पोस्ट व्हायरल केली जात आहे. ज्यामध्ये हार्दिक पांड्यानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेबाबत एक दावा केल्याचे दावे केले जात होते. जर भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत जायचं असेल तर रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेत जसप्रीत बुमराहाला द्यावी, कारण त्याच्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता दिसून येते. हे खोटं वक्तव्य हार्दिक पांड्याच्या नावावर शेअर केलं जात आहे.
नेमकं काय व्हायरल होत आहे?
फेसबुक यूजर ‘क्रिकेट जानकारी’ ने 22 डिसेंबर 2024 ला व्हायरल पोस्ट शेअर करत म्हटलं की “हार्दिक पांड्याने म्हटलंय जर भारताला WTC च्या फायनलमध्ये जायचं असेल तर रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेत जसप्रीत बुमराहला द्यावं, कारण त्याच्यामध्ये नेतृत्त्वाची क्षमता आहे.”
यासंदर्भातील आर्काईव पोस्ट लिंक पाहा
पडताळणी
व्हायरल पोस्टचं सत्य शोधून काढण्यासाठी आम्ही गुगलवर संबंधित कीवर्डर्सचा वापर केला. त्याद्वारे सर्च करण्यात आलं. या दाव्यासंदर्भात कोणतीही विश्वसनीय बातमी मिळाली नाही, ज्यामध्ये हार्दिक पांड्याचं वक्तव्य कोणत्याही बातमीत दिसून आलं नाही. हार्दिक पांड्यानं असं म्हटलं असतं तर त्याची बातमी झाली असती.
आम्ही या बाबत सत्य शोधण्यासाठी अधिक पर्यायांचा वापर केला. हार्दिक पांड्याच्या सोशल मीडिया खात्यांची तपासणी केली असता तिथं देखील व्हायरल पोस्ट संदर्भातील माहिती आढळली नाही.
हार्दिक पांड्याच्या एक्स पोस्टला भेट द्या
अधिक माहितीसाठी आम्ही दैनिक जागरणचे क्रीडा संपादक अभिषेक त्रिपाठीसोबत संपर्क साधला. त्यांनी म्हटलं की यासंदर्भात केला जात असलेला दावा चुकीचा आहे. हार्दिक पांड्याकडून अशा प्रकारचं वक्तव्य करण्यात आलेलं नाही.
ही पहिलीच वेळ नाही की हार्दिक पांड्याच्या नावानं चुकीच्या गोष्टी व्हायरल करण्यात आल्यात. यापूर्वी देखील हार्दिक पांड्यासह, विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद सिराजच्या नावानं चुकीच्या पोस्ट व्हायरल करण्यात आल्या होत्या. यासंदर्भातील फॅक्ट चेकच्या स्टोरी तुम्ही विश्वास न्यूजच्या वेबसाईटवर पाहू शकता.
अखेर आम्ही हा चुकीची पोस्ट शेअर कऱणाऱ्या यूजर्सच्या अकाऊंटची पडताळणी केली. आम्हाला दिसून आलं की हा यूजर क्रिकेटर आणि खेळाडूंशी संबंधित पोस्ट शेअर करत असतो.
निष्कर्ष : विश्वास न्यूजला आपल्या पडताळणीत आढळलं की हार्दिक पांड्यानं रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढण्याबाबत कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. हार्दिक पांड्याच्या नावानं चुकीच्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत.
[डिस्क्लेमर: ही बातमी पहिल्यांदा विश्वास न्यूजवर प्रकाशित झाली होती. एबीपी माझानं 'Shakti Collective' अंतर्गत हे वृत्त प्रकाशित केलं असून मूळ बातमीचा अर्थ बदलेलं असा कोणताही बदल केलेला नाही.]