मंदिर पिकनिक स्पॉट नाही, हिंदू नसलेल्यांना प्रवेश देऊ नये- मद्रास कोर्ट
तमिळनाडूच्या डिंडिगुल जिल्ह्यातील पलानी दंडयुथापानी स्वामी मंदिराने (Arulmigu Dhandayuthapaniswamy Temple) अहिंदूंना मंदिरात प्रवेश नाकारण्यात यावा, अशी याचिका मद्रास कोर्टात दाखल केली होती.
Madras High Court : मंदिरात ध्वजस्तंभाच्या आत हिंदू नसणाऱ्यांनी प्रवेश करु नये, हे काय पिकनिक स्पॉट आहे नाही, असे मद्रास हायकोर्टानं (Madras High Court ) सांगितलं आहे. तमिळनाडूच्या डिंडिगुल जिल्ह्यातील पलानी दंडयुथापानी स्वामी मंदिराने (Arulmigu Dhandayuthapaniswamy Temple) अहिंदूंना मंदिरात प्रवेश नाकारण्यात यावा, अशी याचिका मद्रास कोर्टात दाखल केली होती. त्याप्रकरणी मंगळवारी सुनावणी झाली. मद्रास हायकोर्टानं यासंदर्भात राज्य सरकारला आदेश दिले आहेत. मंदिरामध्ये बोर्ड लावण्याचे आदेश दिले आहेत. हिंदूंनाच हिंदू मंदिरात प्रवेश द्यावा. मंदिर पिकनिक स्पॉट नाही, हिंदू नसलेल्यांना प्रवेश देऊ नये. गैर हिंदू असलेल्यांना शपथपत्र देऊन मगच प्रवेश द्यावा असे मद्रास हायकोर्टनं सुनावणीवेळी सांगितलं.
मद्रास हायकोर्टानं मंगळवारी तामिळनाडू सरकारच्या हिंदू धार्मिक आणि धर्मदाय यंत्रणेला मंदिरामध्ये बोर्ड लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर हिंदू नसलेल्या व्यक्तींना ‘कोडिमारम’(ध्वजस्तंभ) परिसराच्या पुढे जाण्यास परवानगी नसल्याचं लिहिलेलं असावं. हिंदूंना आपला धर्म माणण्याचं आणि पालन करण्याचा अधिकार असल्याचेही कोर्टानं म्हटले आहे.
Tamil Nadu | Madurai bench of the Madras High Court orders that non-Hindu are not allowed to cross the Palani Murugan Temple beyond the flagpole.
— ANI (@ANI) January 31, 2024
Senthilkumar from Palani had filed a petition in the Court. The notice board at the temple, which prohibited non-Hindus from entering…
दक्षिणेतील अनेक मंदिरांमध्ये कोडिमारम (ध्वजस्तंभ) उभारलेला असतो. या ध्वजस्तंभाच्या आत हिंदू नसलेल्या व्यक्तींना प्रवेश देण्यात येऊ नये. त्यासंदर्भात मंदिरामध्ये पाटी लावण्यात यावी, अशा पाट्या लावण्यात याव्यात. असेही कोर्टानं सांगितलेय. पलानी दंडयुथापानी स्वामी मंदिराने यासंबंधी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश एस. श्रीमती यांनी याबाबतचा निर्णय दिला.
याचिका दाखल करणाऱ्याचं काय म्हणणं ?
पलानी मंदिराच्या बोर्डवरील सदस्य सेंथिल कुमार यांनी मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी म्हटले होते की,"प्रसिद्ध पलानी मुरुगन मंदिरात रोज हजारो लोक येतात. यामध्ये गैर हिंदूंची संख्या मोठी असते. त्यांच्या वागणुकीमुळे हिंदू धार्मिक भाविकांच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे त्यांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखण्यात यावे." मंगळवारी मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश एस. श्रीमती यांनी निकाल दिला.
कोर्ट काय म्हणाले ?
मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश एस.श्रीमती यांनी निकाल देताना सांगितलं की, मंदिरात आणि परिसरात गैर हिंदू पर्यटक मोठ्या संख्येनं येत असतील तर मंदिर प्रशासानेने खातरजमा करावी. मंदिराला भेट देणाऱ्यांमध्ये सर्वजण भाविकच आहेत का? त्यांची श्रद्धा आहे का ? ते हिंदू धर्मातील परंपरा जपतात का? मंदिराने ठरविलेला पोषाख परिधान केलेला आहे का? हे पाहण्याची जबाबदारी मंदिर प्रशासनाची आहे. जर गैर हिंदूंना मंदिरात प्रवेश करायचा असेल तर मंदिर प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.