रामलल्लाचा भव्य प्रतिष्ठापना सोहळा; घराघरांत आमंत्रण, अक्षता वाटप, राज्यातील 1 कोटींपेक्षा अधिक रामभक्तांचा जल्लोष
महाराष्ट्रातील 355 साधू - संतांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खास निमंत्रित करण्यात आलं आहे.
नागपूर: अयोध्येत (Ayodhya) प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार आहे. त्यानिमित्त गृहसंपर्क अभियान राबवण्यात येतंय. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने घरोघरी अक्षता आणि मंदिराचे फोटो पाठवून 23 जानेवारीपासून श्री रामाच्या दर्शनासाठी या असं आग्रहाचं निमंत्रण पाठवलं जाते आहे. आधी महाराष्ट्रात 95 लाख कुटुंबात असं निमंत्रण पाठवण्याचं नियोजन होतं. मात्र, आता कार्यकर्त्यांचा उत्साह आणि लोकांची राममय भावना लक्षात घेता 1 कोटीपेक्षा जास्त कुटुंबापर्यंत हे निमंत्रण जाईल असा अंदाज विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी व्यक्त केला आहे.
अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठेचा अनुषंगाने श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासच्या वतीने सामान्य नागरिकांच्या घरी अक्षदा आणि मंदिराचं फोटो पाठवून 23 जानेवारीपासून श्री रामाच्या दर्शनासाठी या असे आग्रहाचे निमंत्रण दिले जात आहे. आधी महाराष्ट्रात 95 लाख कुटुंबात असे निमंत्रण पाठवण्याचे नियोजन होते. मात्र, आता कार्यकर्त्यांचा उत्साह आणि लोकांची राममय भावना लक्षात घेता 1 कोटीपेक्षा जास्त कुटुंबापर्यंत हे निमंत्रण जाईल अशी स्थिती आहे. हा आकडा 1 कोटी 5 लाखाच्या पुढे ही जाऊ शकतो असा अंदाज आहे. श्रीरामाच्या मंदिरासाठी लोकांच्या भावना अप्रतिम आहे, आम्हाला ही कधी नव्हे असे अनुभव येत आहे. त्यामुळे आमचे कार्यकर्ते उत्साहाने अक्षदा पोहोचवून श्रीरामाच्या दर्शनासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्याचे प्रयत्न करत असल्याची माहिती गोविंद शेंडे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील 355 साधू - संतांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण
महाराष्ट्रातून एकूण 889 जणांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले असून त्यामध्ये 534 विशेष निमंत्रित आहेत. त्यामध्ये उद्योग, क्रीडा, कला तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा समावेश आहे.तर महाराष्ट्रातील 355 साधू - संतांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खास निमंत्रित करण्यात आलं आहे.
22 जानेवारीच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील कोणत्या विभागातून किती प्रतिष्ठित निमंत्रीत?
महाराष्ट्रातून एकूण निमंत्रित - 889
महाराष्ट्रातून विशेष निमंत्रित - 534
- कोकण - 397
- पश्चिम महाराष्ट्र - 84
- मराठवाडा (देवगिरी ) - 17
- विदर्भ - 36
- महाराष्ट्रातून निमंत्रित साधू संत - 355
- त्यामध्ये कोकण - 74
- पश्चिम महाराष्ट्र -124
- मराठवाडा (देवगिरी) - 80
- विदर्भ - 77
अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
हे ही वाचा :