राजा विक्रमादित्यला गोमाताने दाखवला राम जन्मभूमीचा मार्ग, जाणून घ्या राम जन्मभूमीची आख्यायिका
अनेक वर्ष राजा विक्रमादित्य यांनी राजन्मभूमी शोधण्याचा प्रयत्न केला आणि अखेर ते अयोध्येत पोहोचले.
अयोध्या : अयोध्येत (Ayodhya) भव्य राम मंदिराचं (Ram Mandir) 22 जानेवारीला उद्धाटन होणार आहे. त्याची सर्वत्र लगबग सुरू आहे. मात्र रामजन्मभूमी कोणी आणि कशी शोधली, अयोध्येत पहिल्यांदा राम मंदिर कोणी उभारलं, 1949 ला राम कसे प्रकट झाले, इत्यादी प्रश्न तुम्हाला पडलेच असतील. एबीपी माझानं याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली आहेत. उज्जैनचे राजा विक्रमआदित्य यांना महादेवाने अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे आदेश दिले, अशी माहिती रामजन्मभूमी आणि राम मंदिरचा इतिहास रामजन्मभूमि ट्रस्टचे सदस्य आणि भाजपचे माझी खासदार डॅा. रामविलास वेदांती (Ram Vilas Vdanti) यांनी एबीपी माझाला दिली आहे.
डॅा. रामविलास वेदांती यांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्जैनचे राजा विक्रमआदित्य यांना महादेवाने अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे आदेश दिले. अनेक वर्ष राजा विक्रमादित्य यांनी राजन्मभूमी शोधण्याचा प्रयत्न केला आणि अखेर ते अयोध्येत पोहोचले. शरयू नदीच्या काठांवर बसलेले असताना राजा विक्रमआदित्य यांना काळ्या घोड्यावर एक काळा व्यक्ती येताना दिसला. ती व्यक्ती घोड्यासह पाण्यात गेली. पाण्यातून बाहेर आल्यानंतर ती व्यक्ती पांढरी शुभ्र झाली.
गोमातेने दाखवला राम जन्मभूमीचा मार्ग
राजा विचारात पडला त्यांनी त्या व्यक्तींचा पाठलाग केला त्या व्यक्ती ने सांगितलं की, मी इथे दर रामनवमीला पाप धुण्यासाठी येतो. तेव्ह त्यांना कळलं की जिथे ते उभे आहेत ती रामाची नगरी अयोध्या आहे. राजाने विचारलं की मला प्रभू श्रीरामाची जन्मभूमीच्या ठिकाणी जायचं आहे. त्यानंतर त्या व्यक्तीने राजाला सांगितलं की, मी गेल्यावर एक गाई येईल ती गाई जिथे जाऊन थांबेल ती जागा राम जन्मभूमी असेल. राजा गाईच्या मागे गेला आणि त्यांना अखेर राम जन्मभूमी मिळाली. राजा विक्रमआदित्यने तिथे एक भव्य राम मंदिर बांधले.
1949 साली राम प्रकट झाल्याची आख्यायिका
22/23 डिसेंबर 1949 ला प्रभू श्री राम प्रकट झाल्याची गोष्ट अयोध्येत प्रचलीत आहे. माहितीनुसार, त्या मध्यरात्री मंदिराच्या आत अचानक वीज कडाडली आणि आत रामलल्ला विराजमान असल्याचे तिथे उपस्थित बरकत अली नावाच्या पोलीस कान्स्टेबलने माहिती दिली. त्यानंतर देश भारतील साधू, संत, महंत, राम भक्त मोठ्या संख्येने अयोध्येत दाखल झाले. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी मंदिरातून रामाची मूर्ती हलवण्याचे आदेश दिल्याचे राम विलास वेदांता यांचे म्हणणे आहे. पण राम भक्तांच्या विरोधामुळे तसं होऊ शकले नाही. त्यानंतर देशभरातील राम भक्तांना राम प्रकट झाल्याची माहिती मिळाली. अयोध्येत हिंदू समुदाय मोठ्या संख्येत येऊ लागला. हे पाहता मुस्लिम समुदायने या प्रकरणात 1950 मध्ये पहिली एफआयआर दाखलं केली आणि तेव्हापासून राम जन्नभूमीवरुन वाद पेटला.