(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नागपुरात ढगफुटी सदृश पाऊस; नागनदीला पूर, घरांमध्येही पाणी शिरलं, वाहानांचं मोठं नुकसान
Nagpur Rain Updates: नागपूर शहरात रात्रीतून ढगफुटी सदृश पाऊस, डागा ले-आऊट, गांधीनगर आणि कॉर्पोरेट कॉलनीतील अनेक घरांमध्ये शिरलं पाणी, अनेक वाहनांचे मोठं नुकसान
Nagpur Rain Updates: मध्यरात्रीपासून नागपुरात (Nagpur News) मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. शहरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यानं नागनदीला पूर आला आहे. नाग नदीच्या काठच्या घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, या पुराचं पाणी शिरल्यानं अनेक घरांचं नुकसान झालं आहे. तर पाणी शिरल्यानं अनेक वाहनांचंही मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. मध्यरात्रीपासून नागपुरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. शहरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यानं नागनदीला पूर आला आहे. नाग नदीकाठच्या घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. तसेच, या पुराचं पाणी शिरल्यानं अनेक घरांचं नुकसान झालं आहे. तर पाणी शिरल्यानं अनेक वाहनांचंही मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे.
मध्यरात्री नागपूर शहराला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपलं आहे. वाडीत ढगफुटीजन्य पाऊस कोसळल्यानं नागनदीला पूर आला आहे. नागनदीकाठी घरामध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. संजीव हजारी, सेपू अपार्टमेंट, अतकरी, माणके पाटील, रमेश विलोनकर, पांडुरंग आणि हाडकर, नवनाथ बागवाले आणि सत्यसाई सोसायटितील अनेक घरांत पुराचं पाणी शिरलं आहे. हजारी यांच्या घराची वाँल कम्पाऊंड जमिनदोस्त झाली आहे. अतकरी, रमेश विलोनकर यांच्या गोड्या पाण्याच्या विहीरी पुराच्या पाण्यानं तुडुंब होऊन ओव्हर फ्लो, परीसरातील सर्वांची दुचाकी आणि चारचाकी वाहनं तीन फुट पुराच्या पाण्यात डुबली. शनिवारला सकाळी चार ते साडे पाचपर्यंत विजांच्या भयावह गडगडाटीसह रेकाँर्ड ब्रेक मुसळधार पाऊस झाला आहे.
नागपुरात काल रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मला दिली.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 23, 2023
नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना…
नागपुरातील पूरस्थितीबाबत देवेंद्र फडणवीसांचं ट्वीट, म्हणाले...
नागपुरातील मुसळधार पावसाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्वीट केलं आहे. फडणवीसांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "नागपुरात काल रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मला दिली. नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या 2 चमू बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत. सातत्याने प्रशासनाशी संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत."
नागपूर महापालिकेचं आवाहन
नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे की, नागपूर शहरात रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आवश्यक कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये. सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी तसेच रस्त्यांवर पाणी जमा झाले आहे. नदी नाल्यांमध्ये पाणी वाढत असल्यामुळे पूल ओलांडू नये. पाणी कमी झाल्यानंतरच पूल ओलांडावा. अंबाझरी तलावाचे पाणी ओव्हरफ्लो झालेले आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांकडे लक्ष देऊ नये. तलाव अथवा ओव्हरफ्लोकडे कुणीही जाण्याचा प्रयत्न करू नये. नागपूर महागरपालिकेचे अग्निशमन व आपत्कालीन सेवा पथक सातत्याने मदत व बचावकार्य करीत आहेत. कुठल्याही आपत्कालीन सेवेसाठी लगेच मनपाला 07122567029 किंवा 07122567777 या क्रमांकावर संपर्क साधा. अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा पथक रात्रीपासून मदत व बचाव कार्यात असून पथकाला सहकार्य करा.
नागपूर जिल्हा आणि महानगरातील शाळांना सुट्टी जाहीर
नागपूर शहरांमध्ये रात्री दोन वाजता पासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाला असून जिल्हा आणि महानगर प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन पथक कार्यरत आहे. आज सकाळीच जिल्हाधिकारी आणि महानगर पालिका आयुक्तांनी शहरातील अनेक भागांची पाहणी केली आहे. शहरासह जिल्ह्यातील परिस्थितीवर आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांना (जिल्हा आणि महानगर क्षेत्र) जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज सुटी जाहीर केली आहे.