एक्स्प्लोर

विधानसभा अध्यक्षांकडून नागपुरात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा

अधिवेशनाच्या निमित्ताने विधानभवन आणि इतर संबंधित वास्तुंमधील सोयीसुविधांची देखरेख, डागडुजी आणि नूतनीकरण आदी कामे करण्यात आली नव्हती. ते तात्काळ करण्याचे आदेश नार्वेकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.

नागपूरः महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Assembly) येत्या 19 डिसेंबरपासून नागपूर येथे होणार आहे. त्या दृष्टीने विधानभवन, परिसर, रविभवन (Ravi Bhavan), नागभवन (Nagbhavan), आमदार निवास (MLA Hostel) आणि 160 गाळे आदींच्या पूर्वतयारीचा आढावा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज घेतला. अधिवेशनाच्या निमित्ताने आवश्यक असलेल्या विविध सोयी-सुविधांबाबतच्या कामांचा विस्तृत अहवाल येत्या पंधरा दिवसांमध्ये सादर करण्याचे आदेश यावेळी त्यांनी दिले. विधिमंडळाच्या मंत्री परिषद सभागृहात राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशनासाठी करावयाच्या व्यवस्थेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम व इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. 

कोविड केअर सेंटरमुळे देखभाल दुरुस्ती

कोविड महामारीच्या काळात आमदार निवास आणि रविभवन येथे कोविड केअर सेंटर (covid care centre) सुरु करण्यात आले होते. कोविडमुळे डिसेंबर 2019 नंतर नागपूर येथे विधिमंडळाचे एकही अधिवेशन झाले नाही. त्यामुळे दरवर्षी अधिवेशनाच्या निमित्ताने विधानभवन (Vidhan Bhavan Nagpur) आणि इतर संबंधित वास्तुंमधील सोयीसुविधांची देखरेख, डागडुजी आणि नूतनीकरण आदी कामे करण्यात आली नव्हती. त्यामुळे या परिसरातील सर्व कामांसह इमारतीच्या नुतनीकरणाचे अंदाजपत्रक तयार करुन ते तात्काळ सादर करण्याचे आदेश नार्वेकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.

बाहेरुन येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच्या व्यवस्थेची पाहणी

सभागृह परिसरातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि उपसभापती आदी पीठासीन अधिकाऱ्यांसह मंत्र्यांच्या दालनातील आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा तपासून घेऊन अपेक्षित बदल, दुरुस्ती, डागडुजी करावी. काही ठिकाणी आवश्यक असल्यास नवीन यंत्रणा बसवावी. सभागृहातील विद्युत व आसन व्यवस्था, ध्वनीक्षेपण यंत्रणा, स्वच्छतागृहे आदी सुविधांबाबत आवश्यक ती कामे करण्यात यावीत, असे आदेश अध्यक्षांनी दिले. अधिवेशनाच्या कालावधीत बंदोबस्तासाठी बाहेरुन मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचारी नागपुरात दाखल होतात. या सर्व कमर्चाऱ्यांसाठी आवश्यक ती निवासव्यवस्था आणि पुरेशी स्वच्छतागृहे उपलब्ध करुन देण्याबाबतही त्यांनी अधिका-यांना सांगितले. या कर्मचाऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी तत्परतेने कार्यवाही करण्याचे त्यांनी संबंधितांना सांगितले.

यावर्षीपासून डिझेल गिझर बंद

यापूर्वी हिवाळी अधिवेशनामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासव्यवस्था असलेल्या 160 गाळ्यांमध्ये पाणी तापविण्यासाठी असणारी डिझेलवरील गिझर यंत्रणा ही प्रदूषण वाढविणारी होती. मात्र आता अद्ययावत आणि पर्यावरणस्नेही यंत्रणा बसविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने या बैठकीत सादरीकरण केले.  या यंत्रणेची गरज लक्षात घेऊन त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही अध्यक्ष नार्वेकर यांनी संबंधितांना दिले. बैठकीनंतर अध्यक्षांनी उपस्थित अधिकाऱ्यांसह दोन्ही सभागृहे, पीठासीन अधिकारी आणि मंत्री महोदयांच्या दालनासह विधानभवन परिसराची पाहणी केली. यानंतर रविभवन, 160 गाळे, आमदार निवास आदी वास्तुंची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Sandip Deshpande : शिवसेनेच्या 'या' आव्हानावर मनसेने पुन्हा डिवचले, काय आहे प्रकरण?

Nagpur News : प्रेक्षकांनी कारचा प्रवास टाळावा, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा; भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी पोलिसांच्या सूचना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास चर्चा; देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा
उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास चर्चा; देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! जळगावात 'सैराट'ची पुनरावृत्ती; लग्नाच्या 5 वर्षांनंतर मुलीच्या घरच्यांनी मुलाला संपवलं
प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! जळगावात 'सैराट'ची पुनरावृत्ती; लग्नाच्या 5 वर्षांनंतर मुलीच्या घरच्यांनी मुलाला संपवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूदAkshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास चर्चा; देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा
उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास चर्चा; देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! जळगावात 'सैराट'ची पुनरावृत्ती; लग्नाच्या 5 वर्षांनंतर मुलीच्या घरच्यांनी मुलाला संपवलं
प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! जळगावात 'सैराट'ची पुनरावृत्ती; लग्नाच्या 5 वर्षांनंतर मुलीच्या घरच्यांनी मुलाला संपवलं
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Embed widget