अत्तराच्या गोदामाला भीषण आग, एकाचा मृत्यू, तीन गंभीर; नागपूरच्या इतवारीतील आठवड्याभरतील दुसरी आगीची घटना
Nagpur Fire Accident : नागपूरच्या इतवारी परिसरात एक भीषण आग (Nagpur Fire Accident) लागल्याची घटना घडली आहे. या परिसरातील तीन नल चौकातील एक अत्तराच्या दुकानाला ही आग लागलीय.
Nagpur News नागपूर : नागपूरच्या इतवारी परिसरात एक भीषण आग (Nagpur Fire Accident) लागल्याची घटना घडली आहे. या परिसरातील तीन नल चौकातील एक अत्तराच्या दुकानाला ही आग लागलीय. हाती आलेल्या माहितीनुसार पहाटेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या अत्तरच्या दुकानात (Perfume Shop) इतर केमिकलचा वापर होत असल्यान ही आग अल्पावधीतच वाढली. पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याने आग लागल्याचे उशीरा लक्षात आल्याचेही बोलले जात आहे. या आगीत एका अल्पवयीन मुलीचा होरपळून मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले असल्याचीही माहिती पुढे आली आहे. तर यातील जखमींना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दीघांची प्रकृती चिंताजनक असल्याचीही माहिती पुढे आली आहे.
आगीत अल्पवयीन मुलीचा होरपळून मृत्यू , तीन गंभीर
मिळालेल्या माहितीनुसार, इतवारी परिसरात तीन नल चौकातील प्रवीण बागडे यांचे श्री रेणुका नॉव्हेल्टी नावाचे दुकान आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास अचानक या दुकानाला आग लागल्याची घटना घडली. यावेळी संपूर्ण कुटुंब झोपेत असताना शॉर्टसर्किटमुळे तळमजल्यावर असलेल्या या दुकानाला आग लागल्याची घटना घडली. अल्पावधीतच आगीने संपूर्ण इमारतीला वेढले. त्यामुळे तळमजल्यावर असलेल्या अत्तरच्या दुकानापाठोपाठ मधल्या माळ्यावर असलेल्या प्लास्टिक गोडाऊनला देखील आगीने वेढलं आहे. तर शेवटच्या माळ्यावर घरातील आई वडील आणि मुलगा अशा तीन लोकांना उशीरा बाहेर काढण्यात आलंय. यातील मुलगी बचावासाठी बाथरूममध्ये लपली असताना धुरामुळे तिची प्रकृती गंभीर झाली. आणि त्यातच तीचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
आठवड्याभरतील ही दुसरी आगीची घटना
घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्नीशमन दलाच्या 6 गाड्यांनी घटनास्थळ गाठलं. त्यानंतर अग्निशमन दलाकडून पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आलं. इतवारी हा बाजाराचा परिसर असून अतिशय दाटीवाटीचा भाग आहे. त्यामुळे अग्निशामक दलाल आगीपर्यंत पोहचण्यासाठी प्रंचड अडचणीचा सामना करावा लागला. परिणामी, तोपर्यंत अंगाने रौद्ररूप धरण करून मोठ्याप्रमाणात दुकान आणि इतर साहित्याचे नुकसान केलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या परिसरातली गेल्या आठवड्याभरतील ही दुसरी आगीची घटना आहे. नुकतीच याच भागातील अहुजा पेन्ट मार्ट या दुकानाला भीषण आग लागली होती.
इतवारी लोहावली बांगडे मोहल्ला येथे हे दुकान असून अग्निशामकच्या सहा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. निमुळत्या गल्ल्या आणि पेंट मध्ये असलेल्या ज्वलनशीर पदार्थामुळे आग विझवायला प्रचंड अडथळे या वेळी आले होते. मात्र अखेर अथक प्रयत्न करून अग्नीशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आले होते. अशीच एक गाताना आज देखील घडली आहे. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास त्यांनी सुरू केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या