एक्स्प्लोर

SIP : अवघे 1000 रुपये गुंतवा अन् व्हा करोडपती, जाणून घ्या गुंतवणुकीचा 12-30-12 फॉर्म्युला आहे तरी काये?

एसआयपी हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. अवघ्या 1000 रुपयांची गुंतवणूक करूनत तुम्ही करोडपती होऊ शकता. तुम्हाला लाखो रुपयांचे व्याज मिळू शकते.

मुंबई : म्युच्यूअल फंड (Mutual Fund) हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. SIP च्या माध्यमातून तुम्ही म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करू शकता. विशेष म्हणजे तुमच्या सोईनुसार तुम्हाला एसायपी करण्याचा पर्याय मिळतो, त्यामुळेच सध्या एसआयपी हा पर्याय लोकांमध्ये चांगालच प्रसिद्ध होत आहे. एसआयपीत केलेली गुंतवणूक ही शेअर बाजाराशी जोडलेली असते. मात्र तुलनेने एसआयपीत केलेल्या गुंतवणुकीत कमी जोखमी असते. दीर्घकाळासाठी केलेल्या एसआयपीतून तुम्हाला करोडपतीही होता येते. ते नेमके कसे शक्य आहे? हे जाणून घेऊ या..

फक्त 1000 रुपयांची एसआयपी करून होता येईल करोडपती

तुम्ही अगदी 500 रुपयांपासून एसआयपी करू शकता. एसआयपीवर चक्रवाढ व्याजाचाही लाभ मिळतो. म्हणूनच तुम्ही दीर्घकालीन एसआयपी केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. एसआयपीच्याच मदतीने फक्त 1,000 रुपयांची SIP करून थेट करोडपती होऊ शकता. 

12-30-12 या फॉर्म्युल्याने व्हा करोडपती 

तुम्ही 12-30-12 या फॉर्म्युल्याच्या मदतीने एसआयपीत गुंतवणूक चालू केली तर तुम्ही करोडपती होऊ शकता. त्याआधी हा फॉर्म्युला नेमका काय आहे? हे जाणून घेणं गरजेचं आहे. या फॉर्म्युल्यातील 12 या अंकाचा अर्थ आहे. तुम्ही तुमच्या एसआयपीत प्रत्येक वर्षाला 12 टक्क्यांनी वाढ करायची आहे. म्हणजेच प्रत्येक वर्षी टॉप अप एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही गुंतवणूक करत असलेल्या रकमेत 12 टक्क्यांनी वाढ करावी. या फॉर्म्युल्यातील 30 या अंकाचा अर्थ आहे, तुम्ही ही एसआयपी आगामी 30 वर्षांसाठी करायची आहे. तर या फॉर्म्युल्यातील दुसऱ्या 12 अंकाचा अर्थ आहे. SIP वर  केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला साधारण 12 टक्क्यांनी रिटर्न्स मिळतात, असे गृहित धरुया. 

फॉर्म्युला कसे काम करणार? 

वर नमूद केलेल्या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही प्रत्येक महिन्याला 1,000 रुपयांची गुंतवणूक करत आहात, असे गृहित धरुया. या गृहितकानुसार तुम्हाला एका वर्षापर्यंत 1000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. एक वर्ष झाल्यानंतर या एसआयपीमध्ये 12 टक्क्यांनी वाढ करावी लागेल. या नुसार दुसऱ्या वर्षी तुमच्या एसआयपीमध्य 120 रुपयांची वाढ होईल. म्हणजेच दुसऱ्या वर्षी तुम्ही प्रतिमहिना 1120 रुपयांनी एसआयपी कराल. तिसऱ्या वर्षी या रकमेत 12 टक्क्यांनी वाढ होईल. म्हणजेच तिसऱ्या वर्षी तुम्ही वर्षभर 1254 रुपयांची एसआयपी कराल.  

...असे व्हाल करोडपती

वर उल्लेख केल्याप्रमाणे तुम्ही 12 टक्क्यांनी टॉप अप एसआयपी केल्यास आणि पुढचे 30 वर्षे ही एसआयपी चालू ठेवल्यास तुम्ही या 30 वर्षात एकूण 28 लाख 95 हजार 992 रुपयांची गुंतवणूक कराल. त्यावर 12 टक्क्यांनी परताव्याच्या हिसोबाने तुम्हाला 83 लाख 45 हजार 611 रुपयांचे व्याज मिळेल. म्हणजेच 30 वर्षांनी तुम्हाला एकूण 1 कोटी 12 लाख 41 हजार 603 रुपये मिळतील. असा प्रकारे 12-30-12 हा फॉर्म्युला तुम्हाला करोडपती करू शकतो...

हेही वाचा :

'या' पाच स्टॉक्सचा शेअर बाजारात धमाका! भविष्यात देणार 35 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स!

Share Market Holiday : मोठी बातमी! सलग 3 दिवस शेअर बाजार राहणार बंद, लाँग विकएंडचं नेमकं कारण काय?

गुंतवणुकीचे 'हे' सहा जबरदस्त पर्याय माहिती आहेत का? लहान मुलांना भविष्यात कधीच पैसे पडणार नाहीत कमी!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Pune Crime : पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलमध्ये नोकरीची संधी; शैक्षणिक पात्रता काय?Mamta Kulkarni takes 'sanyaas' at Mahakumbh : ममता कुलकर्णीने घेतला संन्यास, महाकुंभ मेळ्यामध्ये स्वीकारली संन्यासाची दीक्षा100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 25 January 2025 ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06PM 24 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Pune Crime : पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
ICC Men ODI Team of the Year 2024 : ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
Bishop Mariann Edgar Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Dindoshi News : मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
Embed widget