गुंतवणुकीचे 'हे' 6 जबरदस्त पर्याय माहिती आहेत का? लहान मुलांना भविष्यात कधीच पैसे पडणार नाहीत कमी!
लहान मुलांचे भविष्य सुरक्षित व्हावे यासाठी पालकांंना गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हे पर्याय नेमके कोणते आहेत? हे जाणून घेऊ या....
Children’s Day 2024 : लहान मुलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित व्हावे यासाठी सरकारतर्फे अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात. यामध्ये सुकन्या समृद्धी योजना, बँक एफडी, मुच्यूअल फंड, नपीएस वात्सल्य योजना अशा योजनांचीही समावेश आहे. दरम्यान लहान मुलांच्या सुरक्षेसाठी गुंतवणुकीचे नेमके कोणकोणते पर्याय आहेत, हे जाणून घेऊ या...
एनपीएस वात्सल्य
एनपीएस वात्सल्य नावाची ही योजना भारत सरकारतर्फे चालवली जाते. मुले भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत यासाठी सरकारने नुकतेच ही योजना चालू केली आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या (PFRDA) माध्यमातून ही योजने चालवली जाते. या योजनेअंतर्गत आई-वडील आपल्या मुलांसाठी 1000 रुपयांपासून बचत करू शकतात. ही योजना मार्केट लिंक्ड असून दीर्घकालीन गुंतवणुकीवर मोठ्या रिटर्न्सचे आश्वासन देते.
गोल्ड ईटीएफ
गोल्ड एक्सचेंज-ट्रेडेड फंड्सच्या (ETFs) माध्यमातून मुलांसाठी गुंतवणूक करता येते. बँक एफडी आणि बँक अकाऊंट्सपेक्षा कमी जोखमी असलेला हा गुंतवणूक पर्याय आहे. शेअर बाजाराच्या तुलनेतही गोल्ड ईटीएफ कमी जोखमी असलेला गुंतवणूक पर्याय आहे. गोल्ड ईटीएफच्या माध्यमातून गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करतो. त्यामुळे जास्त रिटर्न्स मिळण्याची शक्यता वाढते. सोन्याचा भाव जसा-जसा वाढतो, तसा गुंतवणूकदारांना मिळणार नफाही वाढतो.
लहान मुलांसाठी विशेष रिकरिंग डिपॉझिट प्लॅन
एफडीप्रमाणेच अनेक बँका लहान मुलांसाठी गुंतवणूक करण्यासाठी रिकरिंग डिपॉझिट प्लॅनचा पर्याय देतात या योजनेच्या माध्यमातून जास्त रिटर्न्स मिळण्याची संधी उपलब्ध होते. आरडी अकाउंटमध्ये एफडीप्रमाणेच प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम जमा केली जाते. या जमा रकमेवर एक निर्धारित व्याज मिळते.
म्युच्यूअल फंडात गुंतवणूक
जास्त जोखीम घेण्याची क्षमता असलेले गुंतवणूकदार आपल्या मुलांच्या भविष्यासाठी म्युच्यूअल फंडातही गुंतवणूक करू शकतात. त्यासाठी गुंतवणूकदार म्युच्यूअल फंडात चाइल्ड सेव्हिंग प्लॅनचा पर्याय निवडू शकतात. थेट शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापेक्षा तुम्ही म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करू शकता.
सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना ही योजना फक्त मुलींसाठी तयार करण्यात आलेली आहे. या योजनेत पालक आपल्या मुलीच्या नावाने पैशांची गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यावर करसवलतही मिळू शकते. या योजनेअंतर्गत कोणताही गुंतवणूकदार आपल्या मुलीच्या नावाने कमीत कमी 250 रुपये जमा करू खाते खोलू शकतो. मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तरच या योजनेत खाते खोलता येते.
लगान मुलींसाठी PPF अकाउंट
लहान मुलांसाठी पीपीएफ अकाऊंट खोलून त्यात गुंतवणूक करता येते. अशा प्रकारच्या अकाऊंटमध्ये जमा केलेल्या रकमेचा लॉग-इन पिरियड हा 15 वर्षांचा असतो. लहान मुलांसाठी उघडलेल्या पीपीएफ अकाऊंटमधील पैसे फक्त लहान मुलांच्या फायद्यासाठीच वापरता येतात. मुलाचे आई-वडील किंवा दोघेही मिळून लहान मुलांच्या पीपीएफ खात्यात गुंतवणूक करू शकतात...
हेही वाचा :