Helpline : फक्त एक call अन् पावसाळी समस्या Solve
शहरातील पावसाळी समस्या सोडविण्यासाठी मनपाच्यावतीने 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. नागरिकांनी कुठल्याही अपात्कालीन परिस्थीतीत खाली दिलेल्या झोननिहाय हेल्पवाइन क्रमांकावर संपर्क साधावा.
नागपूर : शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रशासन प्राधान्याने कार्य करीत आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या या बचाव कार्याद्वारे शहरातील नागरिकांना दिलासा मिळवून देण्याचा प्रयत्न मनपातर्फे सुरू आहे.
पावसामुळे गुरूवारी 14 जुलै रोजी धंतोली झोनमधील नवीन बाबुलखेडा परिसरात घराची भिंत पडल्याने तीन व्यक्ती त्याखाली दबल्याची घटना घडली. माहिती प्राप्त होताच मनपाच्या नरेंद्रनगर अग्निशमन स्थानक चमूने तात्काळ घटनास्थळी धाव घेउन बचावकार्य केले. तिनही व्यक्तींना बाहेर काढल्यानंतर त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. किशोर केसवार (वय 39) असे मृतकाचे नाव असून त्यांची पत्नी श्रीशयली केसलवार (वय 27) आणि मुलगा गौरव केसलवार यांचा जीव वाचविण्यात बचाव पथकाला यश आले आहे.
याशिवाय शहरात अनेक ठिकाणी घरात पाणी शिरण्याच्या आणि झाड पडल्याच्या तक्रारी मनपाकडे प्राप्त झाल्या. यावरही बचावासंदर्भात कार्यवाही करण्यात आली. गोकुळपेठ बाजार रोडवरील ओम मेडिकल जवळ, फॅन्टसी हॉटेल वाडी नाका नं. 10 पूर्वी, अशोक चौक ग्रेट नाग रोड, गंगाबाई घाट चौक आणि मेडिकल चौक रस्त्यावर पाणी जमा झाल्याची तक्रार प्राप्त झाली. याशिवाय जरीपटका येथील समता नगर आंबा टोली येथे घरात पाणी घुसल्याची तक्रार प्राप्त झाली. या सर्व तक्रारींवर तात्काळ दखल घेउन कार्यवाही करण्यात आली. मंगळवारी झोन अंतर्गत भागात रस्त्यावर खड्डा पडल्याची तसेच गांधीबाग झोनमधील भागात झाड पडल्याची तक्रार प्राप्त होताच त्यावर कार्यवाही करण्यात आली.
झोननिहाय 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष
अ.क्र. झोनचे नाव संपर्क क्रमांक
1. लक्ष्मीनगर 2245833/2245028
2. धरमपेठ 2567056/2565589
3. हनुमाननगर 2755589
4. धंतोली 2958401/2958400
5. नेहरूनगर 2700090/2702126
6. गांधीबाग 2735599
7. सतरंजीपुरा मो.7030577650
8. लकडगंज 2737599/2739020
9. आशीनगर 2655605/2655603
10. मंगळवारी 2596903