एक्स्प्लोर
झाकीर नाईकच्या वडिलांचं निधन, अटकेच्या भीतीने झाकीर परदेशातच
मुंबई : इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा संस्थापक झाकीर नाईक याचे वडील अब्दुल कर्म नाईक यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. मात्र, भारत सरकार आणि तपास यंत्रणाच्या भीतीनं झाकीर नाईक वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिलेला नाही.
मुंबईतल्या माझगावमधील नारियल वाडीतल्या कब्रस्तानात झाकीर नाईकचे वडील अब्दुल कर्म नाईक यांचे अंत्यविधी करण्यात आले. अंत्यविधीसाठी मोठ्या प्रमाणात लोक जमले होते. मात्र, अटकेच्या भीतीनं झाकीरनं अंत्यविधीला येणं टाळलं.
दहशतवादाला खतपाणी देणं आणि धर्मपरिवर्तनाच्या आरोपांमुळे झाकीर नाईक गेल्या काही महिन्यांपासून देशाबाहेर आहे. केंद्र सरकारने झाकीर नाईकच्या संस्थेवर बंदी घातली आहे. त्यानंतर झाकीर देशात परतलाच नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement