एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
झाकीर नाईकच्या संस्थेकडून राजीव गांधी ट्रस्टला 50 लाखांची देणगी!
मुंबई : वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टला 50 लाख रुपये देणगी दिल्याचं म्हटलं जात आहे. आयआरएफनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण काही महिन्यांपूर्वीच ही देणगी परत केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
महिलांना शिक्षण, मुलींना मेडिसिन आणि सर्जरीच्या उच्च शिक्षणासाठी मदत करण्यासाठी 2011 मध्ये इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनने ही रक्कम राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टला देणगी म्हणून दिली होती.
देणगी म्हणून दिलेली रक्कम स्वीकारल्याचं काँग्रेसने मान्य केलं. परंतु आयआरएफने ही रक्कम राजीव गांधी फाऊंडेशनला नाही तर राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टला दिल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. पण झाकीर नाईक यांच्या विवादानंतर सर्व कागपत्र बघितल्यानंतर रक्कम आम्ही परत केली, असं काँग्रेसचं म्हणणं आहे.
तर दुसरीकडे पैसे राजीव गांधी फाऊंडेशनला नाही तर चॅरिटेबल ट्रस्टला नाही, अस झाकीर नाईकच्या संस्थेने सांगितलं. शिवाय काँग्रेसने परत केलेली रक्कम अद्याप आमच्या खात्यात जमा झालेली नाही, अंसही आयआरएफच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका गांधी या संस्थेचे संस्थापक आहेत. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे ट्रस्टी आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
सोलापूर
निवडणूक
Advertisement