एक्स्प्लोर

आरेला हात लावला तर आम्ही सहन करणार नाही : आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत आरेमधील मुंबई मेट्रो 3 च्या कारशेडला विरोध केला. या भागात असलेलं वन्यजीवांचं अस्तित्त्व दाखवणारं एक प्रेझेंटशनही त्यांनी दिलं.

मुंबई : आरे जंगलातील कारशेडवरुन शिवसेना आणि भाजप आमने-सामने उभे ठाकण्याची चिन्हं आहेत. एकीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आरेमधील वृक्षतोडीचं समर्थन करत असताना, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मात्र वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात मैदानात उतरले आहेत. "आरेला हात लावला तर आम्ही सहन करणार नाही," असं आदित्य ठाकरे यांनी ठणकावलं. आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत आरेमधील मुंबई मेट्रो 3 च्या कारशेडला विरोध केला. या भागात असलेलं वन्यजीवांचं अस्तित्त्व दाखवणारं एक प्रेझेंटशनही त्यांनी दिलं. मात्र मेट्रोला किंवा विकासकामांना विरोध नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. तसंच आरेमध्ये कारशेड सुचवणारे कोण होते? हा घोटाळा आहे का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. शिवाय याबाब तज्ज्ञांनी दिलेले अहवाल रद्द करुन एमएमआरसीएल देशाचं पर्यावरण मंत्रालय का चालवत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. आदित्य ठाकरे म्हणाले की, "आम्ही सगळे मुंबईसाठी बसलेले आहोत. मेट्रो आम्हाला सगळ्यांना हवी आहे, पण ही जी काही दादागिरी चालू आहे, मनमानी सुरु आहे, सगळं काही आम्ही सहन केलं आहे, पण मुंबईत आरेला हात लावला तर आम्ही सहन करणार नाही." "आम्ही फक्त विरोधासाठी विरोध करत नाही. पण मुंबईतून काहीतरी नष्ट होणार आहे आणि ते आम्हाला नको आहे. लोकांचा जो आवाज आहे तो सरकारने ऐकावा,  एमएमआरसीएलने ऐकावा. हा फक्त 2700 झाडांचा प्रश्न नाही तर त्यापेक्षा आणखी काहीतरी आहे. इथल्या जैवविविधता, प्रजाती, पक्ष, कीटक आणि तिथे असलेल्या सगळ्या गोष्टींचा आहे," असं आदित्य ठाकरे म्हणाले. संबंधित बातम्या आरेच्या कारशेडला विरोध करणाऱ्यांनो गैरसमजुती दूर करा : आयुक्त प्रविणसिंह परदेशी आरेतील वृक्षतोडीविरोधाच्या आंदोलनात राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे सहभागी, भर पावसात मुंबईकर एकवटले मेट्रो कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीचा निर्णय झाला असला तरी काम सुरु करण्याची परवानगी दिलेली नाही, पालिकेची हायकोर्टात माहिती आरेसाठी 'राज'पुत्र आखाड्यात, अमित ठाकरेंचा 'सेव्ह आरे'चा संदेश देणारा व्हिडीओ व्हायरल आरे मेट्रो कारशेडसाठी दोन हजार 238 झाडांवर कुऱ्हाड पडणारच, सत्तेत असूनही शिवसेना अपयशी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : हर्षवर्धन पाटलांआधी अंकिता पाटलांनी भाजप सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?
मोठी बातमी : हर्षवर्धन पाटलांआधी अंकिता पाटलांनी भाजप सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?
नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान शेवटी दीर्घ झोपेतून जागे झाले, अभिजात भाषेच्या मुद्द्यावरून काँग्रेसची खोचक टीका
नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान शेवटी दीर्घ झोपेतून जागे झाले, अभिजात भाषेच्या मुद्द्यावरून काँग्रेसची खोचक टीका
तर काकाने मनाचा मोठेपणा दाखवून योजनेचे स्वागत करावं, लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून आशिष देशमुख यांचे अनिल देशमुखांना आवाहन
तर काकाने मनाचा मोठेपणा दाखवून लाडकी बहीण योजनेचे स्वागत करावं, आशिष देशमुख यांचे अनिल देशमुखांना आवाहन
हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नाराज? पुढील 2 दिवसात ठोस निर्णय घेणार
हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नाराज? पुढील 2 दिवसात ठोस निर्णय घेणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaSharad Pawar PC : 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या, शरद पवारांचं मोठं वक्तव्यABP Majha Headlines : 9 AM : 4 OCT 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 8 AM : 4 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : हर्षवर्धन पाटलांआधी अंकिता पाटलांनी भाजप सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?
मोठी बातमी : हर्षवर्धन पाटलांआधी अंकिता पाटलांनी भाजप सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?
नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान शेवटी दीर्घ झोपेतून जागे झाले, अभिजात भाषेच्या मुद्द्यावरून काँग्रेसची खोचक टीका
नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान शेवटी दीर्घ झोपेतून जागे झाले, अभिजात भाषेच्या मुद्द्यावरून काँग्रेसची खोचक टीका
तर काकाने मनाचा मोठेपणा दाखवून योजनेचे स्वागत करावं, लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून आशिष देशमुख यांचे अनिल देशमुखांना आवाहन
तर काकाने मनाचा मोठेपणा दाखवून लाडकी बहीण योजनेचे स्वागत करावं, आशिष देशमुख यांचे अनिल देशमुखांना आवाहन
हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नाराज? पुढील 2 दिवसात ठोस निर्णय घेणार
हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नाराज? पुढील 2 दिवसात ठोस निर्णय घेणार
Sharad Pawar: शरद पवारांचे संकेत; हर्षवर्धन पाटलांबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाले दुपारपर्यंत....
शरद पवारांचे संकेत; हर्षवर्धन पाटलांबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाले दुपारपर्यंत....
Supriya Sule: अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरूय; मित्रासोबत गेलेल्या तरूणीवर अपहरण करून सामूहिक अत्याचार, सुप्रिया सुळेंची पोस्ट
अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरूय; मित्रासोबत गेलेल्या तरूणीवर अपहरण करून सामूहिक अत्याचार, सुप्रिया सुळेंची पोस्ट
Ratnagiri Crime News : 'दोन दिवस राहिलेत, जगून घे...', एक-दोन नाही तर 30 दुकानांसमोर आढळल्या धमकीच्या चिठ्ठ्या, रत्नागिरीतील घटनेने खळबळ
'दोन दिवस राहिलेत, जगून घे...', एक-दोन नाही तर 30 दुकानांसमोर आढळल्या धमकीच्या चिठ्ठ्या, रत्नागिरीतील घटनेने खळबळ
Bopdev Ghat Incident: तरुणाला बांधून ठेवलं, 21 वर्षीय तरुणीवर तिघांकडून अत्याचार, बोपदेव घाटातील हादरवणारा घटनाक्रम पोलिसांनी सांगितला!
तरुणाला बांधून ठेवलं, 21 वर्षीय तरुणीवर तिघांकडून अत्याचार, बोपदेव घाटातील हादरवणारा घटनाक्रम पोलिसांनी सांगितला!
Embed widget