एक्स्प्लोर

Yes Bank Crisis | येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना 11 मार्चपर्यंत ईडीची कोठडी

राणा कपूर यांना शनिवारी दुपारी बॅलॉर्ड इस्टेट येथ असलेल्या ईडी कार्यालयात आणण्यात आलं होतं. राणा कपूर यांच्या विरोधात लूक आउट नोटीसही जारी करण्यात आलं आहे. याचाच अर्थ, ते आता देश सोडून जाऊ शकत नाहीत. राणा कपूर यांना अटक केल्यानंतर ईडी आपला मोर्चा आता इतर अधिकाऱ्यांकडे वळवू शकते.

मुंबई : येस बँकेचे संस्थापक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांना 11 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. तब्बल 31 तास चौकशी केल्यानंतर ईडीने राणा यांना अटक केली होती. येस बँक प्रकरणी राणा यांच्या पत्नीचीही चौकशी करण्यात आली आहे. आज पहाटे 4 वाजता त्यांना अटक करण्यात आली. काल मध्यरात्रीपासून त्यांची चौकशी केल्यानंतर दुपारी ईडी कार्यालयात त्यांना आणण्यात आलं होतं. त्यानंतर कार्यालयात चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना प्रीवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट कोर्ट म्हणजेच, पीएमएलए कोर्टात सादर करण्यात येणार आहे. तसेच राणा कपूर यांच्या पत्नी बिंदू यांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. डीएचएफएल आणि यूपी पॉवर कॉर्पोरेशनला कर्ज देत फायदा मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दरम्यान, शनिवारी ईडीने दिल्ली आणि मुंबईमध्ये काही ठिकाणी छापेही मारले होते.

राणा कपूर यांना शनिवारी दुपारी बॅलॉर्ड इस्टेट येथ असलेल्या ईडी कार्यालयात आणण्यात आलं होतं. राणा कपूर यांच्या विरोधात लूक आउट नोटीसही जारी करण्यात आलं आहे. याचाच अर्थ, ते आता देश सोडून जाऊ शकत नाहीत. राणा कपूर यांना अटक केल्यानंतर ईडी आपला मोर्चा आता इतर अधिकाऱ्यांकडे वळवू शकते.

YES Bank | येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर ईडीचा छापा, देश सोडून जाण्यावर निर्बंध

राणा कपूर यांच्या घरावर ईडीचा छापा

राणा कपूर यांच्या वरळीतील समुद्र महल घरावर ईडीच्या सहा सदस्यांच्या टीमने काल रात्री छापा टाकला होता. मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत ईडीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी सुरू केली होती. त्यानंतर राणा कपूर यांच्याविरोधाथ लूक आऊट नोटीसही बजावण्यात आली होती. त्यामुळे कपूर यांना देश सोडून जाता येणार नाही. राणा कपूर यांच्यावर वारेमाप कर्जवाटप केल्याचा आरोप आहे. डीएचएफएल कंपनीला कर्ज देण्याच्या बदल्यात फायदा मिळवल्याचा गंभीर आरोप यांच्यावर करण्यात आला आहे. राणा कपूर यांनी येस बँकेद्वारे आपल्या अधिकारात नियमबाह्य कर्ज वाटप केलं आहे. कर्ज वाटप करणे आणि ते वसूल करण्याची प्रक्रियाही त्यांनी ठरवली. आपल्या वैयक्तिक संबंधातून हे कर्ज वाटप केल्याचं समोर आलं आहे. 2017 मध्ये राणा यांनी जवळपास 6355 कोटींची कर्ज वाटप केल्याचं उघड झालं आहे.

पाहा व्हिडीओ : Yes Bank Crisis | येस बँकेवरच्या निर्बंधामुळं राज्यातील 109 बँका अडचणीत

राणा कपूरचा नीरव मोदींच्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट

वरळीच्या समुद्र महल बिल्डिंगमध्ये राणा कपूर यांचा प्लॅट आहे. या बिल्डिंगमध्ये देशातील अनेक व्यावसायिक, मोठ्या कंपन्यांचे सीईओ राहतात. पीएनबी बँक घोटाळ्याचा आरोपी नीरव मोदीचाही या बिल्डिंगमध्ये फ्लॅट आहे. या समुद्र महल बिल्डिंगमधील फ्लॅट 1 लाख स्क्वेअर फूटाने विकला गेला होता, त्यावेळी ही बिल्डिंग चर्चेत आली होती.

रिझर्व्ह बँकेचे आर्थिक निर्बंध, ग्राहक केवळ 50 हजार रुपये काढू शकणार

रिझर्व्ह बँकेने येस बँकेवरती आर्थिक निर्बंध घातले आहेत. त्यानुसार 3 एप्रिलपर्यंत येस बँकेचे ग्राहक केवळ 50,000 रुपये काढू शकणार आहेत. या निर्णयाचा परिणाम आज शेअर बाजारातही दिसून आला. येस बँकेच्या शेअर्समध्ये शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. त्याचे शेअर्स 74 टक्क्यांनी खाली आले. आर्थिक संकटाचा सामना करीत येस बँकेच्या समभागात होणारी पडझड पाहून गुंतवणूकदार आणि खातेदारांमध्ये कमालीची भीती पसरली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime: सोलापूरमध्ये पोलीस कॉन्स्टेबलची बदली झाली, टोकाचा निर्णय घेऊन आयुष्य संपवलं
सोलापूरच्या बार्शीत पोलीस कॉन्स्टेबलचं धक्कादायक पाऊल, टोकाचा निर्णय घेऊन आयुष्य संपवलं
लग्नात बिबट्या घुसला अन् वधू वरानं धूम ठोकली; कॅमेरामन झाला 'स्पायडरमॅन'; पंगतीमधील लोकं ताट सोडून दिसेल त्या मार्गाने फरार
लग्नात बिबट्या घुसला अन् वधू वरानं धूम ठोकली; कॅमेरामन झाला 'स्पायडरमॅन'; पंगतीमधील लोकं ताट सोडून दिसेल त्या मार्गाने फरार
साहित्य महामंडळाला अंधारात ठेवून एकनाथ शिंदेंच्या सत्काराचा कार्यक्रम, नियम धाब्यावर बसवले? आयोजक संजय नहार म्हणाले...
साहित्य महामंडळाला अंधारात ठेवून एकनाथ शिंदेंच्या सत्काराचा कार्यक्रम, नियम धाब्यावर बसवले? आयोजक संजय नहार म्हणाले...
Prabhakar Karekar Passed Away: नाट्यसंगीतातला दिग्गज हरपला! जेष्ठ शास्त्रीय गायक पं प्रभाकर कारेकर यांचं निधन
नाट्यसंगीतातला दिग्गज हरपला! जेष्ठ शास्त्रीय गायक पं प्रभाकर कारेकर यांचं निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajan Salvi On Eknath Shinde : शिवसेनाप्रवेशापूर्वी ठाण्यात भेट,शिंदेंनी साळवींना काय आश्वासन दिलं?ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 13 February 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सUday Samant On Rajan Salvi : राजन साळवींना कोणती जबाबदारी? उदय सामंतांनी सगळं सांगितलंABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 13 February 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime: सोलापूरमध्ये पोलीस कॉन्स्टेबलची बदली झाली, टोकाचा निर्णय घेऊन आयुष्य संपवलं
सोलापूरच्या बार्शीत पोलीस कॉन्स्टेबलचं धक्कादायक पाऊल, टोकाचा निर्णय घेऊन आयुष्य संपवलं
लग्नात बिबट्या घुसला अन् वधू वरानं धूम ठोकली; कॅमेरामन झाला 'स्पायडरमॅन'; पंगतीमधील लोकं ताट सोडून दिसेल त्या मार्गाने फरार
लग्नात बिबट्या घुसला अन् वधू वरानं धूम ठोकली; कॅमेरामन झाला 'स्पायडरमॅन'; पंगतीमधील लोकं ताट सोडून दिसेल त्या मार्गाने फरार
साहित्य महामंडळाला अंधारात ठेवून एकनाथ शिंदेंच्या सत्काराचा कार्यक्रम, नियम धाब्यावर बसवले? आयोजक संजय नहार म्हणाले...
साहित्य महामंडळाला अंधारात ठेवून एकनाथ शिंदेंच्या सत्काराचा कार्यक्रम, नियम धाब्यावर बसवले? आयोजक संजय नहार म्हणाले...
Prabhakar Karekar Passed Away: नाट्यसंगीतातला दिग्गज हरपला! जेष्ठ शास्त्रीय गायक पं प्रभाकर कारेकर यांचं निधन
नाट्यसंगीतातला दिग्गज हरपला! जेष्ठ शास्त्रीय गायक पं प्रभाकर कारेकर यांचं निधन
IPO Update :हेक्सावेअर टेक्नोलॉजीजचा  8750 कोटींचा आयपीओ येणार, किंमतपट्टा किती? GMP कितीवर पोहोचला?
हेक्सावेअर टेक्नोलॉजीजचा 8750 कोटींचा आयपीओ येणार, किंमतपट्टा किती? GMP कितीवर पोहोचला?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना मोठा धक्का! नाशिकमधील बड्या नेत्यांचा मनसे, ठाकरे गटाला 'रामराम'
एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना मोठा धक्का! नाशिकमधील बड्या नेत्यांचा मनसे, ठाकरे गटाला 'रामराम'
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये शिखर धवनची एन्ट्री! ICC ची मोठी घोषणा, सोपवली महत्त्वाची जबाबदारी
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये शिखर धवनची एन्ट्री! ICC ची मोठी घोषणा, सोपवली महत्त्वाची जबाबदारी
Maharashtra Weather Update: पहाटे गारवा वाढला, दुपारी उष्णतेच्या झळा कायम! राज्यात येत्या 3 दिवसांत तापमान कसे? वाचा IMD Alert
पहाटे गारवा वाढला, दुपारी उष्णतेच्या झळा कायम! राज्यात येत्या 3 दिवसांत तापमान कसे? वाचा IMD Alert
Embed widget