एक्स्प्लोर
रेल्वेच्या सुलभ शौचालयात महिलेचा विनयभंग
मुंबई: रेल्वे प्रवासी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारण रेल्वे शौचालयात प्रवासी महिलेचा विनयभंग करण्यात आला. धक्कादायक म्हणजे सुलभ शौचालयाच्या सफाई कामगारानेच विनयभंग केल्याचा आरोप आहे.
वसईच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि ५ वर ही घटना घडली. याप्रकरणी महिलेने वसई रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
वसई रेल्वे पोलिसांनी सफाई कामगार प्रकाश माईकल डिसोजा या ४५ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
काल दुपारी सव्वा बाराच्यादरम्यान प्रवासी महिला वसई स्टेशनवरील शौचालयाचा वापर करण्यासाठी आत गेली. त्यावेळी तिथे काम करणारा सफाई कामगार डिसोजा हा नशेत महिलेच्या मागून शौचालयात शिरला.
घाबरलेल्या महिलेने प्रसंगावधान ओळखून बाहेर धाव घेत, थेट वसई पोलीस ठाणे गाठलं. वसई रेल्वे पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
विश्व
राजकारण
विश्व
Advertisement