एक्स्प्लोर

दरवर्षी पावसाळ्यात मुंबई बेहाल होण्यामागे नेमकं कारण काय?

काही तासांच्या जोरदार पावसामुळे मुंबईत पाणी साठण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून कमी होण्याऐवजी वाढतच आहे. मुंबई महापालिका पावसाळ्याआधी पाणी साचणार नाही असे दावे करते, तरीही पाणी साचतं कसं?

मुंबई : गेल्या काही वर्षात एकही वर्ष असं गेलं नाही की पावसाळा आला आणि तरीही मुंबई शहर सुरळीत सुरु राहीलं. दरवर्षी मुंबईत सलग काही तास पाऊस कोसळल्यानंतर सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात होते. दुर्घटना होतात. मात्र, मुंबई बेहाल होण्यामागे नेमकं कारण काय?  पावसाळ्यापूर्वी मुंबईतल्या यंत्रणा सज्ज असल्याचा दावा दरवर्षी केला जातो. पण काही तासांच्या पावसातच हा दावा फोल ठरताना दिसतो. गेल्या काही वर्षांपासून दर पावसाळ्यात किमान एकदा तरी मुंबईची अवस्था अशीच होते, असं निरीक्षण आहे. पण हे असं का घडतं?

पावसाळ्यात मुंबईची चिंता वाढवणारे प्रमुख स्पॉट 

अंधेरी सब वे 

अंधेरी सब वे येथे दरवर्षी मुसळधार पावसात नदी तलावचं स्वरूप प्राप्त होतं. अंधेरी सब वेला पाणी का तुंबत? तर सर्व सबवे हे रेल्वे ट्रॅक खालून रस्त्याच्या उतारावर तयार केले आहेत.अंधेरी सब वे जवळचा नाला जिथे सबवेचं पाणी सोडले जाते तो नाला सुद्धा तुडूंब भरून वाहू लागतो. त्यावेळी सब चेचं पाणी सोडायाचं कुठे हा प्रश्न निर्माण होतो.  

हिंदमाता

मुसळधार पावसामध्ये नेहमीच हिंदमाता परिसर पाण्याखाली जातो. अनेक वर्ष हिंदमातामध्ये हीच परिस्थिती आहे. 

एक नाही, दोन नाही... तर तब्बल 400 गाड्या पाण्याखाली; मुसळधार पावसामुळे मुंबईत पालिकेच्या पार्किंगमध्ये पाणीच पाणी

सायन स्टेशन

मुसळधार पावसामध्ये सायन स्टेशन हे सर्वात आधी पाणी सचणाऱ्या स्टेशन पैकी एक आहे. या ठिकाणी पाणी साचलं की मुंबईची लाईफलाईन म्हटली जाणारी लोकलचा खोळंबा होतो. ज्याचा फटका लाखोंच्या संख्येने प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसतो.

मुंबईला पूरमुक्त करण्यासाठी आजवर काय केलं गेलंय 

1) ब्रिमस्टोवॅट प्रकल्प 

26 जुलै 2005 च्या पुरानंतर माधवराव चितळे समितीनं केलेल्या शिफारसींनुसार मुंबईत ब्रिमस्टोवॅड म्हणजेच पर्जन्य जलवाहिन्यांचं जाळं तयार करण्याचं काम हाती घेण्यात आलं. या शिफारशीनुसार शहर आणि उपनगरांमध्ये 58 प्रकल्प हाती घेण्यात आले.

मुसळधार पावसात पर्यटनाचा अतिउत्साह, सीबीडीच्या डोंगरावर फिरायला गेलेल्या 350 जणांना वाचवलं, डोंबिवलीतही थरारक रेस्क्यू ऑपरेशन

2) पंपिंग स्टेशनची उभारणी

या पर्जन्य जलवाहिन्यांबरोबरच शहरात पंपिंग स्टेशन उभारण्याची शिफारसही चितळे समितीने केली होती. त्यानुसार शहर आणि उपनगरांमध्ये  पंपिंग स्टेशन उभारली  गेली. या पंपिंग स्टेशनमधल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी समुद्राच्या मुखाशी 27 फ्लड गेट्स बांधण्यात आले आहेत. मात्र, भरती आणि मुसळधार पाऊस या दोन्ही गोष्टी एकत्र घडल्या, तर ही फ्लड गेट्स बंद ठेवावी लागतात. हे दरवाजे उघडले, तर भरतीचं पाणी शहरात घुसण्याची शक्यता असते. त्यामुळे ही गेट्स बंदच ठेवली जातात. परिणामी पंपिंग स्टेशनमधून पाणी समुद्रात जात नाही आणि शहर तुंबतं.

 3)  मिलन सब वेसाठी काय उपाय केले?

भौगोलिकदृष्ट्या सब वे उताराला आहे. त्यामुळे आजूबाजूचे पाणी येथे जमा होऊन विले पार्ले पूर्व-पश्चिम सब वे मार्ग मुसळधार पावसात बंद होतो. मागील काही वर्षांपासून या सबवे जवळ तुंबलेल्या पाण्याचा निचरा कमी वेळेत होतो याचं कारण पंपिंग स्टेशन्स आणि सबवे रस्त्यावर लोखंडी जाळी टाकून केलेली खोली. कारण पावसाचे पाणी या ठिकाणी जमा होऊन जवळच्या नाल्यात सोडलं जाते.

4) हिंदमातासाठी काय उपाययोजना केल्या? 

हिंदमाता परिसरात पाणी वाहून नेण्यासाठी ब्रिटानिया उदंचन केंद्र (पंपिंग स्टेशन) बांधण्यात आले. तरीही निचरा न झाल्यामुळे 2017 मध्ये अभ्यासपूर्ण सूक्ष्म नियोजन करण्यात आले. त्यानंतर हिंदमाता परिसरातील पर्जन्यजल वाहिन्यांच्या सक्षमीकरणाची व पुनर्बांधकामाची कामे हाती घेण्यात आली होती.  हिंदमाता परिसराला जोडणाऱ्या 7 किमी लांबीच्या पर्जन्यजल वाहिन्यांचे सक्षमीकरण करण्यात आले. हिंदमाता परिसरातील साचणारे पाणी  भूमीगत टाक्यांमध्ये साठवण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पालिकेने यंदा वाहतूक ठप्प होऊ नये म्हणून एक समांतर प्रयोग केला होता. परळ उड्डाणपूल आणि हिंदमाता उड्डाणपुलादरम्यान महानगरपालिकेने जोडरस्ता बांधला आहे. या दोन्ही पुलांच्यामधील रस्त्याची उंची वाढवण्यात आली असून त्यामुळे पाणी तुंबले तरी वाहतूक सुरळीत सुरू राहील, अशी ही योजना आहे.

5) मिठी नदी 

मिठी नदीची धोकादायक पातळी 4.5 मीटर मानली जाते. मुंबई महापालिका प्रशासन मिठी नदीने 3.2 मीटर पातळी गाठली की आजुबाजूच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवायला सुरुवात करते. मातोश्री नजीकच्या कलानगर भागात पाणी शिरु नये यासाठी तेथील नाल्यांच्या मुखावर फ्लडगेट बसवण्यात आलेत. परवा रात्री मुसळधार पाऊस झाला तेव्हा मिठी नदीची पातळी 4.2 मीटर्सपर्यंत वाढली होती. सध्या मिठी नदीची पातळी 2.40 मीटर आहे.

सध्या पवई, विहार, तुलसी हे तीनही तलाव ओव्हरफ्लो झालेत. विहार आणि पवई या दोन्ही तलावांची पातळी वाढली की ओव्हरफ्लो झालेले पाणी मिठी नदीला येऊन मिळते. त्यामुळे सतत अतिमुसळधार पाऊस, भरतीची वेळ, आणि पवई-विहार तलाव ओव्हरफ्लो झाले तर मिठी नदीची पातळी वाढते आणि आजुबाजूच्या परिसराला मोठाच धोका निर्माण होतो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News: ....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
दोस्तीत कुस्ती... पुण्यात प्यायला बसले, मित्राचा खून करुन गाव गाठले; पण रक्ताने माखलेला मोबाईल बोलला, आरोपीला बेड्या
दोस्तीत कुस्ती... पुण्यात प्यायला बसले, मित्राचा खून करुन गाव गाठले; पण रक्ताने माखलेला मोबाईल बोलला, आरोपीला बेड्या
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
Nashik News : सहा महिन्यांपूर्वी व्याजाने घेतले पैसे, तडजोड होत नसल्याने तरुण लॉजवर गेला अन्...; नाशिकमध्ये खळबळ
सहा महिन्यांपूर्वी व्याजाने घेतले पैसे, तडजोड होत नसल्याने तरुण लॉजवर गेला अन्...; नाशिकमध्ये खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05PM 18 February 2024Suresh Dhas on Dhananjay Munde Meets | आजारी असल्यामुळे माणुसकीच्या नात्याने मुंडेंना भेटायला गेलो- सुरेश धसSantosh Deshmukh Case | देशमुखांची हत्या अनैतिक संबंधांतून दाखवण्याचा पोलिसांचा कट होता, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आरोपABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04PM 18 February 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News: ....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
दोस्तीत कुस्ती... पुण्यात प्यायला बसले, मित्राचा खून करुन गाव गाठले; पण रक्ताने माखलेला मोबाईल बोलला, आरोपीला बेड्या
दोस्तीत कुस्ती... पुण्यात प्यायला बसले, मित्राचा खून करुन गाव गाठले; पण रक्ताने माखलेला मोबाईल बोलला, आरोपीला बेड्या
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
Nashik News : सहा महिन्यांपूर्वी व्याजाने घेतले पैसे, तडजोड होत नसल्याने तरुण लॉजवर गेला अन्...; नाशिकमध्ये खळबळ
सहा महिन्यांपूर्वी व्याजाने घेतले पैसे, तडजोड होत नसल्याने तरुण लॉजवर गेला अन्...; नाशिकमध्ये खळबळ
Jitendra Awhad : संभाजी महाराजांना इथल्या एका व्यवस्थेने कायम बदनाम केलंय; संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह लिखाणावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका 
संभाजी महाराजांना इथल्या एका व्यवस्थेने कायम बदनाम केलंय; संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह लिखाणावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका 
Tanaji Sawant Security: बँकॉकचं विमान समुद्रातून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, फडणवीसांच्या आदेशामुळे 48 पैकी फक्त एक सुरक्षारक्षक उरला
बँकॉकचं विमान हवेतून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, 48 पैकी फक्त 1 बॉडीगार्ड उरला
Nashik Godavari : नाशिकमध्ये गोदावरी काँक्रिटीकरणाचा मुद्दा ऐरणीवर! काँक्रिट हटवण्याची मागणी, प्रशासनाची डोकेदुखी वाढली
नाशिकमध्ये गोदावरी काँक्रिटीकरणाचा मुद्दा ऐरणीवर! काँक्रिट हटवण्याची मागणी, प्रशासनाची डोकेदुखी वाढली
गरीब, गरजू रुग्णांना नाहक त्रास; MPJAY चे आरोग्य मित्र बेमुदत संपावर, राज्यभर धरणे आंदोलन
गरीब, गरजू रुग्णांना नाहक त्रास; MPJAY चे आरोग्य मित्र बेमुदत संपावर, राज्यभर धरणे आंदोलन
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.