एक्स्प्लोर

एक नाही, दोन नाही... तर तब्बल 400 गाड्या पाण्याखाली; मुसळधार पावसामुळे मुंबईत पालिकेच्या पार्किंगमध्ये पाणीच पाणी

कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्सच्या पार्किंगच्या जागेत शिरलेले पाणी उपसण्याचे काम सध्या सुरु आहे. लवकरच पार्किंमध्ये शिरलेल्या पाण्याचा निचरा होईल, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे.

मुंबई : दोन दिवस मुंबईत बरसणाऱ्या धुवांधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय तर काही ठिकाणी मोठ्या दुर्घटना होऊन जीवतहानीही झाली आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसानं आतापर्यंत 30 मुबईकरांचा जीव घेतला आहे. या पावसानं जीवितहानीबरोबरच मोठं आर्थिक नुकसान देखील केलं आहे. असाच काहीसा प्रकार घडलाय मुंबईतील कांदिवली भागात. एक नाही, दोन नाही, तर तब्बल 400 हून अधिक गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या. 

मुंबईच्या कांदिवलीतल्या ठाकूर कॉम्प्लेक्समधल्या बीएमसीच्या पार्किंगमधल्या 400 पेक्षा जास्त गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या. मुसळधार पावसामुळे कांदिवलीतल्या ठाकूर कॉम्प्लेक्समधल्या बीएमसीच्या पार्किंगमध्ये पाणी साचलं. त्यामुळे पार्किंगमध्ये असलेल्या 400 हून अधिक गाड्या पाण्याखाली गेल्या. पावसाचा जोर ओसरल्यानंतर पार्किंगमधलं पाणी कमी झालं. अन् गाड्यांची झालेली दुरावस्था पाहून धक्काच बसला. वाहनांची अवस्था पाहून, महापालिकेला नक्की आपण कशासाठी पैसे मोजले होते? असा सवाल वाहनमालकांना नक्कीच पडला असणार. 

कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्सच्या पे अॅन्ड पार्कच्या जागेत शिरलेले पाणी उपसण्याचे काम सध्या सुरु आहे. पे अॅन्ड पार्कच्या जागेत शिरलेले पाणी पंप लावून उपसण्याचं काम केलं जात आहे. लवकरच या पार्किंमध्ये शिरलेलं संपूर्ण पाण्याचा निचरा होईल, अशी माहिती मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्स येथील महानगरपालिकेच्या पार्कींगमध्ये 400 पेक्षा जास्त गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या. यासर्व गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. सध्या पाणी बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. 

सीबीडीच्या डोंगरावर फिरायला गेलेल्या 350 जणांना वाचवलं, डोंबिवलीतही थरारक रेस्क्यू ऑपरेशन

मुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार पावसनं धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या. काही लोकांना आपला जीवही गमवावा लागला. एकीकडे प्रशासनासह मुख्यमंत्र्यांकडूनही गरजेशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे. पण नागरिकांनी कोरोनासह सर्व नियम धाब्यावर बसवत फिरण्यासाठी बाहेर पडले होते. त्यांचा अतिउत्साहीपणा नागरिकांना चांगलाच महागात पडला आहे. 

मुसळधार पावसात गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असं स्वतः मुख्यमंत्री आणि प्रशासकीय यंत्रणांकडूनही सातत्यानं आवाहन केलं जात होतं. पण अशातच काही नागरिकांना त्यांचा अतिउत्साहीपणा चांगलाच भोवला आहे. नागरिकांच्या याच बेफिकीरपणामुळे नवी मुंबईतील काही नागरीक अनेक तास पावसात अडकून पडले होते. नवी मुंबईच्या सीबीडी भागात असलेल्या एका डोंगरातून काल तब्बल 350 जणांची अग्निशमन दलानं सुटका केली आहे. काल रविवारच्या दिवशी काही नागरीक लहान मुलांसह फिरण्यासाठी गेले होते. मात्र मुसळधार पावसानं ओढ्याचं पाणी वाढलं, अन् या पाण्याचा वेग इतका भयंकर होता की, नागरिकांचा परतीचा मार्गच बंद झाला. अखेर या नागरिकांच्या सुटकेसाठी अग्निशमन दलाला धाव घ्यावी लागली. अग्निशमन दलानं या ओढ्यात मानवी साखळी करून तब्बल 350 जणांची सुखरुप सुटका केली आहे. यामध्ये अनेक लहान मुलंही होती. त्यामुळे नागरिकांनो पावसाळा आहे, नसतं धाडस करून धोका ओढवून घेऊ नका, असं आवाहन एबीपी माझाही करत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray interview :…म्हणून राज ठाकरेंसोबत युती नाही!   उद्धव ठाकरेंची बेधडक मुलाखतPriyanka Gandhi SpeechKolhapur|बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला,कोल्हापुरातील आक्रमक भाषणDilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
×
Embed widget