मोठी बातमी! चाकरमान्यांना मनस्ताप; पश्चिम रेल्वे विस्कळीत, बोरिवली स्थानकाजवळ तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेसेवा उशिरानं
Mumbai Local Updates: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेचा खोळंबा झाल्यानं प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. बोरिवली स्थानकाजवळ तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय.
Western Railway Mumbai Local Updates: मुंबई : पश्चिम रेल्वेवर (Western Railway) उपनगरीय रेल्वेसेवा (Suburban Railway Service) उशिरानं धावत आहे. आज आठवड्याचा पहिला दिवस. अशातच पश्चिम रेल्वेनं ऑफस गाठण्यासाठी रेल्वे स्थानकांवर पोहोचलेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. बोरिवली स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड (Technical Failure) झाल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत (Western Railway Traffic Disrupted) झाल्याची माहिती मिळत आहे.
पश्चिम रेल्वेवर उपनगरीय रेल्वेसेवा उशिरानं धावत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेचा खोळंबा झाल्यानं प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या आठवड्यातील जम्बो मेगाब्लॉकच्या मनस्तापानंतर या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना पुन्हा एकदा मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. बोरिवली स्थानकाजवळ तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. बोरिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरून लोकल धावणार नाही, अशी माहिती पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी ट्वीट करून दिली आहे.
#WRUpdates
— Western Railway (@WesternRly) June 3, 2024
Due to some technical issues of cable being cut, point no 107/108, point no 111/112 & point no 131/132 are not operational currently therefore Suburban trains not being operated from platform nos 1 & 2 of Borivali Station.
Trains are being operated from platform nos…
पश्चिम रेल्वेवर उपनगरीय रेल्वेसेवा उशिरानं धावत आहे. यासंदर्भात पश्चिम रेल्वेनं अधिकृत ट्विटर हँडलवरुन माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, केबल कट झाल्याच्या काही तांत्रिक समस्यांमुळे पॉइंट क्र 107/108, पॉइंट क्र 111/112 आणि पॉईंट क्र 131/132 सध्या कार्यरत नाहीत त्यामुळे बोरिवली स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरून उपनगरीय गाड्या चालवल्या जात नाहीत. बोरिवली स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 3, 4, 5, 6, 7 आणि 8 वरून गाड्या चालवल्या जात आहेत. पॉइंट क्रमांक 107, 108 आणि 111 बंद केले जात आहेत आणि सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी जीर्णोद्धाराचे काम प्राधान्यानं सुरू आहे.
पाहा व्हिडीओ : Mumbai Local Train : Western Railway वाहतूक विस्कळीत, पश्चिम रेल्वेचा खोळंबा, प्रवाशांचे हाल