एक्स्प्लोर
वासनांध वॉचमनचं अल्पवयीन मुलीबरोबर अश्लील कृत्य, संतप्त नागरिकांकडून नग्न धिंड काढत चोप
सोसायटीतील नागरिकांना या घटनेची माहिती मिळताच वासनांध वॉचमनला पकडून चांगलाच चोप दिला. त्याची नग्न धिंड काढली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

विरार : विरारमध्ये एका सोसायटीमधून धक्कादायक प्रकरा समोर आला आहे. सोसायटीच्या वासनांध वॉचमनने एका सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा सोसायटीच्या पायऱ्यावरच विनयभंग केल्याची घटना उघड झाली आहे.
विनयभंगाची घटना सोसायटीतील रहिवाशांना समजल्यावर तेथील संतप्त महिलांनी वासनांध वॉचमनला बेदम चोप दिला. तसेच त्याची नग्न धिंड काढून, त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याबाबत वासनांध वॉचमनच्या विरोधात अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
13 जुलै रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास सहा वर्षांची चिमुरडी बाजूच्या इमारतीतीतून खाजगी क्लावरुन आपल्या घरी जात होती. त्यावेळी एक महिला सोसायटी परिसरात तिला भेटली आणि बाजूला इमारतीचा वॉचमनही होता. महिला तेथून निघून जाताच तिला पायऱ्यावर पकडून मिठी मारुन तिच्याशी वॉचमनने अश्लील वर्तन केले आणि तो तिथून फरार झाला. मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. पण तोपर्यंत वॉचमन फरार झाला होता.
सोसायटीतील नागरिकांना या घटनेची माहिती मिळताच वासनांध वॉचमनला पकडून चांगलाच चोप दिला. त्याची नग्न धिंड काढली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. यात तो जखमी ही झाला आहे. पोलिसांनी त्याच्यावर उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे. याबाबत संतप्त नागरिकांच्या तक्रारीवरून त्याच्यावर विनयभंग, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाकडूनच मुलीचा विनयभंग झाल्याने महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. महिलांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. आणि त्याला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट
























