एक्स्प्लोर
व्हिजन पुढच्या दशकाचं : राज ठाकरे यांचं व्हिजन
जिथे पिण्यासाठी पाणी मिळत नाही, शेतीसाठी पाणी मिळत नाही, तिथे तुम्ही शौचालयं बांधा सांगत आहात
मुंबई : "जिथे पिण्यासाठी पाणी मिळत नाही, शेतीसाठी पाणी मिळत नाही, तिथे तुम्ही शौचालयं बांधा सांगत आहात. मराठवाड्यात साधारणपणे 900 ते 1000 फूट खोलीवर पाणी लागत नाही. अशीच परिस्थिती राहिली तर पुढील 15 ते 20 वर्षात मराठवाड्याचा वाळवंट होईल," असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकावर निशाणा साधला.
एबीपी माझाच्या 'व्हिजन पुढच्या दशकाचं' या विशेष कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते.
प्रगतीशील महाराष्ट्राला आणखी मोठ्या उंचीवर नेण्यासाठी लोकशाहीचा गाडा हाकणाऱ्या दिग्गजांच्या मनात नेमकं काय चाललं आहे?, दिग्गजांच्या विकासाचं व्हिजन नेमकं काय आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या विकासाच्या नेमक्या काय कल्पना आहेत? हे जाणून घेण्याचा दरवर्षीप्रमाणे यंदाही 'एबीपी माझा'ने प्रयत्न केला आहे.
पाणी नसताना शौचालयं बांधा असं सांगितलं जात आहे. तर सरकार जाहिरातींवर अमाप पैसा खर्च करत आहे. यावर कोणी खोलात जाऊन स्पष्ट बोलायला तयार नाही. सगळ्या गोष्टी हवेत सुरु आहेत. मूळ विषय संपतील कसे याकडे कोणाचं लक्ष नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं व्हिजन
आणीबाणीच्या वेळी संपादक, पत्रकार, साहित्यिकांनी ठाम भूमिका घेतली, पण आज ठाम भूमिका घेत का नाहीत?: राज ठाकरे
काँग्रेस सरकार थापा मारायचं, पण हे सरकार आणखी थापा मारतं : राज ठाकरे
स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे : राज ठाकरे
'लोकराज्य' मासिक हिंदी आणि गुजरातीमध्ये काढण्याची राज्य सरकारची तयारी : राज ठाकरे
हिंदी भाषेची जबाबदारी कशासाठी? हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही : राज ठाकरे
पुढील 15 ते 20 वर्षात मराठवाड्याचं वाळवंट होईल : राज ठाकरे
पाण्याची सोय नाही, शौचालयं बांधून काय करणार? पाण्याची सोय करा मग शौचालयाची स्वप्न दाखवा : राज ठाकरे
सरकार जाहिरातीवर अमाप खर्च करतंय : राज ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement