एक्स्प्लोर

Insurance Fraud Case : एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा

Insurance Fraud Case : वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्यांचे इन्शुरन्स काढायचे आणि नंतर बनावट कागदपत्रांद्वारे व्यक्तीला मृत दाखवत इन्शुरन्स मिळवायचा अशी कामं आरोपींकडून करण्यात येत होती. 

ठाणे : एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळे मृत्यू दाखले तयार करून विमा कंपनीची फसवणूक करत मिरा भाईंदरमध्ये 70 लाखांचा गंडा (Insurance Fraud Case) घातल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी भाईंदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अद्याप एकालाही अटक करण्यात आली नसून चार जणांचा शोधा सुरु आहे. आरोपींमध्ये एक डॉक्टराचाही समावेश आहे. 

भाईंदर पश्चिमेला रहाणाऱ्या एका कुटुंबाने डॉक्टरच्या मदतीने विविध इन्शुरन्स कंपन्यांची बनावट कागदपत्रे बनवून 69 लाख 60 हजाराची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार जणांवर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून गंडा 

भाईंदर पश्चिमेच्या प्रभातनगर, राई गाव येथे राहणाऱ्या कांचन ऊर्फ पवित्रा रोहीत पै, रोहित पै,  धनराज पै आणि डॉ. आशुतोष यादव यांनी मिळून बनावट कागदपत्रे तयार केली. आरोपी त्या कागदपत्रांच्या आधारे इन्शुरन्स कंपन्यांकडून क्लेम मिळवायचे, टर्म इन्शुरन्स काढायचे आणि त्यानंतर मयत दाखवून त्याचे बनावट कागदपत्रे बनवून इन्शुरन्स कंपनीला सादर करायचे.

सहा कंपन्यांची 70 लाखांची फसवणूक 

आरोपींनी अशा प्रकारे सहा कंपन्यांचे इन्शुरन्स काढले होते. त्यातील 4 इन्शुरन्स कंपनीचा क्लेमदेखील मिळवला. इन्शुरन्स क्लेम मिळाल्यानंतर ते घर सोडून दुसरीकडे रहायला जायचे. तेथे रहायला गेल्यानंतर त्या पत्त्यावर पुन्हा त्याच व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स काढायचे. 

अशा प्रकारे आरोपींनी आयसीआयसीआय कंपनी, मॅक्स लाईफ कंपनी, भारती एक्सा, फ्युचर जनरल, एचडीएफसी इन्शुरंस अशा सहा इन्शुरन्स कंपन्याच्या पॉलिसी काढल्या होत्या. त्यातील चार कंपन्यांकडून 1,10,58,750 रुपयांचा क्लेम केला. क्लेम केल्यानंतर त्या रकमेपैकी 69 लाख 60 हजार रुपयांची क्लेमची रक्कम मिळवला. याप्रकरणी 4 जणांवर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजून एकालाही अटक करण्यात आली नसून चौघांचाही शोध सुरु आहे. 

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indapur : आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2024 | बुधवार
Ajit Pawar NCP : पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का; 18 नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार!
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का; 18 नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार!
Devendra Fadnavis : मोठी बातमी : सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
मोठी बातमी : सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Buldhana : मी कुणाकडूनही पैसे घेतले नाही ; बुलढाण्याच्या खेर्डाचे तलाठी माझावरTOP 50 : संध्याकाळच्या टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 03 July 2024 : ABP MajhaDevendra Fadnavis Ladaki Bahin Yojana : सर्व भगिनींना विनंती,एजंटच्या नादी लागू नका,फडणवीसांचे आवाहनTeam India Mumbai : टीम इंडियाचं मुंबईत जंगी स्वागत करणार, ओपन बसमधून व्हिक्ट्री मार्च काढणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indapur : आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2024 | बुधवार
Ajit Pawar NCP : पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का; 18 नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार!
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का; 18 नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार!
Devendra Fadnavis : मोठी बातमी : सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
मोठी बातमी : सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
हार्दिक पांड्याचा पराक्रम, अष्टपैलू खेळाडूमध्ये पटकावलं अव्वल स्थान
हार्दिक पांड्याचा पराक्रम, अष्टपैलू खेळाडूमध्ये पटकावलं अव्वल स्थान
''आम्ही लाडक्या भावांचाही निर्णय घेतला; महिन्याला 10 हजार देतोय''; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
''आम्ही लाडक्या भावांचाही निर्णय घेतला; महिन्याला 10 हजार देतोय''; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
Joe Biden : ज्यो बायडेन यांचा पहिल्याच चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करेक्ट कार्यक्रम; राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीवर सुद्धा टांगती तलवार
ज्यो बायडेन यांचा पहिल्याच चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करेक्ट कार्यक्रम; राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीवर सुद्धा टांगती तलवार
''अजित पवार माझे मित्र, हे सरकार पुन्हा यावे, मी मंत्री व्हावे''; विजय शिवतारेंचं पांडुरंगाला मागणं
''अजित पवार माझे मित्र, हे सरकार पुन्हा यावे, मी मंत्री व्हावे''; विजय शिवतारेंचं पांडुरंगाला मागणं
Embed widget