एक्स्प्लोर
Advertisement
बिअरच्या बाटल्यांचं बूच बदलणाऱ्या रॅकेटचा वसईत पर्दाफाश
टोळीतील दोघांकडून 15 लाख 39 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यात तीन लाख 39 हजार 400 रुपयांच्या बनावट दारुचा समावेश आहे.
वसई : दमण बनावटीच्या दारु आणि बिअर बॉटलचं बूच बदलून महाराष्ट्रात विकणाऱ्या टोळीचा पालघर जिल्ह्यात पर्दाफाश करण्यात आला. टोळीतील दोघा जणांना अटक करण्यात ठाणे राज्य उत्पादन शुल्क पथकाला यश आलं आहे.
दोघांकडून 15 लाख 39 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यात तीन लाख 39 हजार 400 रुपयांच्या बनावट दारुचा समावेश आहे.
गुजरात, दमण मधून बनावट दारु आणि बिअर महाराष्ट्रात सप्लाय केल्या जात असल्याची माहिती ठाणे राज्य उत्पादन शुल्क पथकाला मिळाली होती. ही बनावट दारु आणि बिअरचे बॉक्स भाजीपाल्याच्या टेम्पोमधून पाठवले जाणार असल्याची माहिती पथकाला मिळाली.
पालघर जिल्ह्यातील चारोटी चेकपोस्टजवळ 15 दिवसांपासून त्यांनी सापळा लावला होता. एका टेम्पोची चारोटी नाक्यावर झडती घेतली असता त्यात भाजीपाला आढळून आला. मात्र आत पुन्हा पाहिलं असता या पथकाला दमणच्या बनावट दारु आणि बिअरचे 105 बॉक्स आढळून आले.
ही दारु विरार फाटा हायवेच्या बाजूला रिकामी करुन त्या ठिकाणी लेबल, बुचं बदलून महाराष्ट्राची लेबल-बुचं लावून महाराष्ट्रात विक्री केली जात असल्याची कबुली आरोपीने पथकाला दिली आहे.
यापूर्वी बनावट परदेशी मद्य तयार करताना खूप जणांना पकडलं आहे, मात्र बिअरच्या बाटलीची बुचं बदलून महाराष्ट्राची बुचं लावण्याची मशिन प्रथमच पकडली असल्याचं पथकातील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
गुजरातच्या दमण येथील बनावटीची दारु आणि बिअर आल्यानंतर त्याचं लेबल हे विरारमधील एका गोदामात बदललं जात होतं. ते कसे बदलतात याचं प्रात्यक्षिक आरोपी आणि अधिकाऱ्यांनी दाखवलं. ही बनावट दारु ओळखली जाऊ नये यासाठी त्याचं बुच, लेबल बदलून ते बिअर शॉप, परमिट रुम यांना मोठ्या किमतीला विकत असल्याचंही तपासात उघड झालं आहे. ही विक्री कुणाला केली जायची, याचा तपासही पोलिस आता करणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
बॉलीवूड
भारत
बुलढाणा
Advertisement