एक्स्प्लोर

शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेले प्रा. आनंद तेलतुंबडेंची दोन वर्षानंतर तळोजा जेलमधून सुटका

Urban Naxal Case: शहरी नक्षलवादाच्या आरोपांप्रकरणी अटकेत असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांची तळोजा जेलमधून सुटका करण्यात आली. बाहेर आल्यावर तेलतुंबडे यांनी आनंद व्यक्त केला

Urban Naxal Case: शहरी नक्षलवादाच्या आरोपांप्रकरणी अटकेत असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांची तळोजा जेलमधून सुटका करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणानंतर (Koregaon Bhima Case)  अटकेत असलेले मानवी हक्क कार्यकर्ते, लेखक आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे (Anand Teltumbde) यांना दिलेला जामीन योग्यच आहे, असं स्पष्ट करत या जामीनाविरोधात एनआयएनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका काल फेटाळून लावली.  उच्च न्यायालयाने मंजूर केलेला जामीन सर्वोच्च न्यायालयानेही योग्य ठरवला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईतील विशेष न्यायालयानेही तेलतुंबडे यांची तळोजा कारागृहातून सुटका करण्याचे आदेश काढले होते. आज तेलतुंबडे यांची तळोजा कारागृहातून सुटका झाली. तेलतुंबडे हे एप्रिल 2020 पासून अटकेत होते. बाहेर आल्यावर तेलतुंबडे यांनी आनंद व्यक्त केला. तेलतुंबडे यांचे तळोजा जेल बाहेर कुटुंबीयांतर्फे स्वागत करण्यात आले. आमदार कपिल पाटील देखील यावेळी उपस्थित होते.

यावेळी आमदार कपिल पाटील यांनी म्हटलं की, संविधान दिनाच्या दिवशी आनंद तेलतुंबडे जेल बाहेर आल्याने न्याय व्यवस्थेवरचा विश्वास दुणावला आहे. अनेक निरपराध लोकशाहीवादी कार्यकर्ते यांच्या सुटकेचा मार्ग यातून मोकळा होईल, असा विश्वास कपिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

गेल्या शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला होता. तेलतुंबडे यांच्यावर लावलेले सर्वच आरोप सिद्ध करण्यात अद्याप तपासयंत्रणेला यश आलेलं नाही. तसेच दहशतवादाशी संबंधित कारवायाअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची कमाल शिक्षा 10 वर्ष असून तेलतुंबडे यांनी 2 वर्षांची शिक्षा भोगली असल्याचं न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी आदेशात नमूद करत तेलतुंबडे यांना एक लाखांचा जामीन मंजूर केला होता. मात्र, या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात दाद मागता यावी, म्हणून स्थगिती देण्याची राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) विनंती मान्य करत हायकोर्टानं आपल्या आदेशाला आठवड्याभराची स्थगिती दिली होती.

पुण्यात 31 डिसेंबर 2017 मध्ये पार पडलेल्या एल्गार परिषदेनंतर 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचार घडला होता. या हिंसाचारामध्ये एकाचा मृत्यू झाला होता तर अनेकजण जखमी झाले होते. त्यानंतर या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. त्याप्रकरणी एप्रिल 2020 मध्ये एनआयएनं आनंद तेलतुंबडे यांना अटक केली होती. तेव्हापासून ते नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयानं तेलतुंबडे हे माओवादींच्या प्रतिबंधित संघटनेचे सदस्य असल्याचे नमूद करत जामीन फेटाळला होता. त्या निर्णयाला आव्हान देत तेलतुंबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. 

31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषदेच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यापैकी तेलतुंबडे हे एक होते. त्यांची भाषणं ही बंदी घातलेल्या माओवादी संघटनेला पाठिंबा दर्शवणारी होती. त्यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणांचे पडसाद 1 जानेवारी 2018 रोजी उसळलेल्या दंगलीत उमटले होते. या संघटनेच्या अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांना तेलतुंबडे उपस्थित होते. तसेच कथित माओवादी नेता आणि भाऊ मिलिंद तेलतुंबडे यांच्याही ते गुप्तपणे संपर्कात होते, असा दावा एनआयएच्या वतीने ॲड. संदेश पाटील यांनी कोर्टात केला होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget