एक्स्प्लोर

Abu Bakar arrested : अबू बकरच्या अटकेनंतर भारताला मोठं यश, ठोस पुरावे हाती लागण्याची शक्यता - उज्वल निकम

1993 साली मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी 12 साखळी बॉम्ब स्फोट घडवण्यात आले होते.अनेक नागरिक या दहशतवादी हल्ल्यात ठार झाले होते.

मुंबई : 1993 साली मुंबई बॉम्बस्फोटातील (mumbai blast)मुख्य सूत्रधार दहशतवादी अबू बकरला ( Abu Bakar) अटक करण्यात आल्याचं वृत्त कळतंय. यूएईमधील (UAE) भारतीय एजन्सीने (indian agency) ही माहिती दिली. तब्बल 27 वर्षानंतर अबू बकरला युएई मधून अटक करण्यात आल्याने याचा फायदा भारतीय तपास यंत्रणेला होणार असल्याचे वक्तव्य सरकारी वकील उज्ज्वल निकम (ujjwal nikam)यांनी केले आहे. अबू बकरच्या अटकेनंतर आणखी ठोस पुरावे हाती लागण्याची शक्यता असल्याने त्याला लवकरात लवकर भारतात आणावे असे निकम यांनी सांगितले.

१९९३ मुंबई बॉंम्बस्फोट : तब्बल 12 साखळी बॉम्बस्फोट

परदेशातील एका मोठ्या ऑपरेशनमध्ये भारतीय एजन्सीला (Indian Agencies) मोठं यश आलं असल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलंय. 1993 साली झालेल्या मुंबई बॉम्ब स्फोटाचील मोस्ट वॉन्टेड आरोपी असलेला दहशतवादी अबू बकला यूएईतून अटक करण्यात आली आहे. 1993 साली मुंबईतील ( Mumbai Serial Bomb Blast) वेगवेगळ्या ठिकाणी 12 साखळी बॉम्ब स्फोट घडवण्यात आले होते. तब्बल 257 लोक या दहशतवादी हल्ल्यात ठार झाले होते, तर 700 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते. तब्बल 29 वर्षानंतर अबू बकर नावाचा मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपी भारतीय यंत्रणांच्या हाती लागला असल्याचं वृत्त इंडिया टुडेच्या सूत्रांनी दिलं आहे. अबू बकर हा पाकव्याप्त काश्मिरात शस्त्रास्त्र आणि स्फोटकांचं प्रशिक्षण देत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मुंबई हल्ल्यात वापरण्यात आलेलं आरडीएक्सचं लॅन्डिंग आणि दाऊबसोबत दुबईतून कट रचण्यात बकरचा हात असल्यामुळे भारतीय यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. अखेर एका मोठ्या ऑपरेशननंतर अबू बकरला पकडण्यात भारतीय यंत्रणांना यश आलं असल्याचं वृत्त हाती येतंय.

अबू बकरला लवकरच भारतात आणलं जाणार
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, 1993च्या बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार अबू बकर असून तो यूएई (UAE) आणि पाकिस्तानात (Pakistan) राहत होता. यूएईमधील भारतीय एजन्सीच्या माहितीनुसार त्याला नुकतच पकडण्यात आल्याचं कळतंय. 2019मध्येही बकरला अटक करण्यात आली होती. मात्र काही कागदपत्रांच्या अडचणींमुळे तो यूएई अधिकाऱ्यांच्या ताब्यातून सटकण्यात यशस्वी झाला होता. अखेर आता त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली असून लवकरच भारतात आणलं जाणार असल्याचं वृत्त हाती येतंय. इंडिया टुडेच्या सूत्रांनी याबाबतचं वृत्त दिलं असून भारतीय यंत्रणांच्या कामगिरीला मोठं यश आलं असल्याचा विश्वास व्यक्त केला जातोय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMahayuti vs MVA : निवडणुकीआधी वक्तव्यांचा 'जिहाद'? महायुतीची रणनीती काय? Special ReportZero Hour Shinde Fadnavis on Hindu Votes : हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी शिंदे-फडणवीसांच्या भेटीगाठीZero Hour MVA And Mahayuti : महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासाठी खलबतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Embed widget