एक्स्प्लोर
'वर्षा' बंगल्यावर आज उद्धव ठाकरे-मुख्यमंत्री भेट
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. आज संध्याकाळी साडेपाच वाजता वर्ष बंगल्यावर दोन्ही नेत्यांची चर्चा होणार आहे.
मागील काही दिवसांपासून शिवसेना-भाजपमधील दरी वाढली आहे. इतकंच नाही तर सत्तेत असूनही शिवसेनेची कामं प्रलंबित आहेत. मात्र त्यावर कुठलीही कारवाई मुख्यमंत्री करत नाहीत, अशी नाराजी शिवसेनेच्या मंत्र्यांची आहे.
त्यामुळे दोन वर्षातील या सर्व प्रलंबित कामांची विभागनिहाय यादी शिवसेनेने तयार केली आहे. हीच नाराजी मांडण्यासाठी उद्धव ठाकरे, प्रतोद आणि मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेना नेत्यांची प्राथमिक बैठक होणार आहे. या बैठकीला स्वत: उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यानंतर सर्व नेते वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement