Uddhav Thackeray : काँग्रेस हरली त्याचं दु:ख आहेच, पण हे 2024 चे शुभसंकेत; निवडणुकांच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray : चार राज्यांच्या निवडणुकांनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
मुंबई : चार राज्यांच्या निवडणुकांची (Assembly Election Result) रणधुमाळी रविवार 3 डिसेंबर रोजी संपूर्ण देशात पाहायला मिळाली. यावर उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस हरली त्याचं दु:ख असेल पण हे 2024 चे शुभसंकेत आहेत, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटलं. तसेच यावेळी त्यांनी तीन राज्यात भाजपचा यश मिळालं आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी भाजपचं अभिनंदन देखील केलं.
चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये चारपैकी तीन राज्यांमध्ये भाजपला यश मिळालं. त्याचप्रमाणे काँग्रेसला फक्त तेलंगणाच गड राखता आला आहे. त्यामुळे भाजपच्या विजयाने राज्यात एकच जल्लोषाचा वातावरण पाहायला मिळालं. यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत त्यांचं अभिनंदन केलंच पण त्याचप्रमाणे त्यांच्यावर टीकास्त्र देखील सोडलं.
महाराष्ट्रात सत्ता परत आणणार - उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचे धन्यावाद मानले. शिवसेनाप्रमुखांनंतर तुम्ही मला नेता मानता, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, सत्ता येते आणि जाते. पण आम्ही महाराष्ट्रात आम्ही सत्ता परत आणणारच असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. आपण लोकशाही टिकावी यासाठी प्रयत्न करतोय. त्यामुळे 2024 ला प्रजा ठरवेल की राजा कोण होणार, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
जे शिवसेना संपवायला निघालेत त्यांना संपवल्याशिवाय राहणार नाही - उद्धव ठाकरे
मिंधे यांना कळत नाहीये आपण काय करतोय ते.लाचारी करतायत सगळे. पण आम्ही बचेंगे और लढेंगे. हे मतदान ईव्हीएमवर होतं. त्यामुळे काय खरं आणि काय खोटं हे त्यांनाच माहित. पण स्वाभिमानासाठी शिवसेनेचा जन्म झालाय. त्यामुळे जे शिवसेना संपवायला निघाले आहेत, त्यामुळे त्यांना संपवल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
लोक एवढी मूर्ख नाहीत - उद्धव ठाकरे
काँग्रेस हरली याचं दु:ख आहेच, पण हे 2024 चे शुभसंकेत आहेत. लोकं एवढी मूर्ख नाहीत. हे लोक लोकसभेसोबत महाराष्ट्राची विधानसभा देखील एकत्र लावू शकतील. पण कितीही वादळं आली तरी परतण्याची ताकद काय असते हे महाराष्ट्र दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.