India Alliance Meeting : कमलनाथ म्हणत होते, अरे भाई छोड़ो अखिलेश, वखिलेश! अन् आता काँग्रेसची 'इंडिया'साठी फोनाफोनी सुरु; नितीशकुमार सुद्धा 'वजनदार' होणार!
India Alliance Meeting : इंडिया ही काँग्रेसच्या नेतृत्वाखालील मोठ्या राजकीय पक्षांची युती आहे. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) सामना करण्यासाठी स्थापना करण्यात आली होती.
India Alliance Meeting : लोकसभेच्या तोंडावर तेलंगणाचा अपवाद वगळता हिंदी भाषिक राज्यात काँग्रेसची धुळदाण झाल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी इंडिया आघाडीमधील घटक पक्षांशी (India Alliance Meeting) तातडीने फोनाफोनी सुरु केली आहे. तेलंगणा सोडून छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसला सत्ता गमवावी लागली आहे. मध्य प्रदेशातही भाजपचा दारुण पराभव झाला. त्यामुळे आता थेट लोकसभेलाच सामना होणार असल्याने काँग्रेसकडून इंडिया आघाडीची जुळवाजुळव सुरु झाली आहे.
मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी आज 6 डिसेंबर रोजी नवी दिल्लीत इंडिया आघाडीमधील (India Alliance Meeting) पक्षांची बैठक होत आहे. या बैठकीचे स्मरण खरगे यांनी करून दिले. मल्लिकार्जुन खरगे यांनी, द्रविड मुनेत्र कळघम (DMK) आणि तृणमूल काँग्रेससह आघाडीमधील पक्षांना बैठकीची माहिती दिली. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी सुद्धा चर्चा केली. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर काही दिवसांनी ही बैठक होणार आहे. त्यामुळे पुढील बैठक महत्त्वाची आहे. पाच राज्यातील निकाल पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची महत्त्वपूर्ण इशारा आहे.
इंडिया ही काँग्रेसच्या नेतृत्वाखालील मोठ्या राजकीय पक्षांची युती आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) सामना करण्यासाठी त्याची स्थापना करण्यात आली होती. जुलै 2023 मध्ये बंगळूरमध्ये विरोधी पक्षाच्या बैठकीत त्याची स्थापना करण्यात आली.
शेवटची इंडिया आघाडीची बैठक उद्धव ठाकरे यांनी आयोजित केली होती
शेवटची इंडिया आघाडीची बैठक उद्धव ठाकरे यांनी आयोजित केली होती. त्यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पाच राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. दोन दिवसांच्या चर्चेमध्ये, युतीने आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रमुख निवडणूक मुद्द्यांवर चर्चा केली, समन्वय समिती तयार केली आणि 2024 च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुका 'शक्य असेपर्यंत' एकत्र लढण्यासाठी तीन-सूत्री ठराव मंजूर केला होता.
नितीश कुमार यांना इंडियाचे नेतृत्व करू द्या (India Alliance Meeting)
दुसरीकडे, जनता दल (युनायटेड) सरचिटणीस निखिल मंडल यांनी ट्विट करून राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खराब कामगिरीबद्दल सुनावले. काँग्रेसच्या नेतृत्वावर आक्षेप घेत मंडल म्हणाले की, इंडिया आघाडीचे नेतृत्व नितीश कुमार यांनी केले पाहिजे. ते म्हणाले की, काँग्रेसने पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये व्यस्त राहून आघाडीकडे दुर्लक्ष केले, परंतु त्यांनी चांगली कामगिरी केली नाही आणि निकाल लागले आहेत. ते पुढे म्हणाले की बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे युतीचे शिल्पकार होते आणि ते खडतर परिस्थितीतून जहाजावर नेव्हिगेट करू शकतात.
काँग्रेसला अहंकार नडला? (India Alliance Meeting)
काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी अरे भाई छोड़ो अखिलेश, वखिलेश अशी टिप्पणी केली होती. आज मध्य प्रदेशातील स्थिती पाहता कमलनाथ यांना अंदाज आला असेल. कर्नाटक निवडणुकीनंतर काँग्रेसला नडलेला अतिआत्मविश्वास सुद्धा जमिनीवर घेऊन आला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीसाठी बोलणी करूनही बॅकफूटवर गेलेल्या नितीशकुमार यांच्यावर पुन्हा फोकस येऊ शकतो. त्यांनी अलीकडील काळात काँग्रेसच्या वर्तनाववर अप्रत्यक्ष तोफ डागली होती. दुसरीकडे, महाराष्ट्रातून शरद पवार आणि उद्धव ठाकरे इंडियामधील महत्वाचा घटक असणार आहे. अशा स्थितीत इंडिया आघाडीची दिल्लीतील बैठक निश्चित दिशा ठरवणारी असेल यात शंका नाही.
इतर महत्वाच्या बातम्या