एक्स्प्लोर

'मग युतीसाठी का आला होतात?' उद्धव यांचा राज ठाकरेंना सवाल

मुंबई: 'दुसरे म्हणतात आम्हाला बाळासाहेबांच्या नावाने महापौर बंगल्याची जागा गिळायची आहे. मग युतीसाठी कशाला आला होता?’ असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना विचारला. 'विधानसभेनंतर मी शिवसेनेचा अपमानही सहन केला. काँग्रेसला दूर ठेऊन नवीन कारभार करू म्हणून मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला. दुय्यम खाती दिली तरी शांत राहिलो. पण शेवटी मुख्यमंत्र्यांनी मला निराश केलं. पंतप्रधनांपासून सोसायटीच्या अध्यक्षापर्यंत सर्वच तुम्हाला हवं. मग आम्ही काय भांडी घासायची?' असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली. ‘मुख्यमंत्र्यांच्या भूलथापा ऐकून लोकं कंटाळली, सभेला पाठ फिरवतात तरी यांना कळत नाही. पुण्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत पारदर्शक गर्दी होती.’ असा टोमणाही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला. ‘मग युतीसाठी कशाला आला होता,’ राज ठाकरेंना टोला दरम्यान, यावेळी आपल्या भाषणात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरही टीका केली. ‘दुसरे म्हणतात आम्हाला बाळासाहेबांच्या नावाने महापौर बंगल्याची जागा गिळायची आहे. मग युतीसाठी कशाला आला होता?’ असं म्हणत उद्धव यांनी राज ठाकरेंना टोला हाणला. ‘तुमची तर नो अॅक्सेस बँक’ ‘आमची लेना बँक, देना बँक नाही.  भरगच्च सभा ही आमची बँक आहे. तुमच्यासारखी नो अॅक्सेस बँक नाही. तुम्हाला जनतेशी ना लेना ना देना.‘ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या नाशिकमधील टीकेला उत्तर दिलं. ‘मुख्यमंत्रीजी माझ्या मुंबईचा अपमान करु नका’ ‘पुण्यात एअरपोर्टवर मला मुख्यमंत्री भेटले. तेव्हा मी त्यांना सांगितलं आमच्यावर काहीही टीका करा. पण मुंबईचा अपमान नको. भाजपच्या जाहिरातीत मुलगी म्हणते आई पकवते, ही तुमची संस्कृती? आमची आई 'मुंबा आई’ आहे. जसं मुलगी मुलाला म्हणते ‘चल हट’ तसं ही मुंबईकरही तुम्हाला म्हणेल 'चल हट!'’ उद्धव ठाकरेंनी अशी बोचरी टीका भाजपच्या जाहिरातीवर केली. ‘शिक्षणमंत्र्यांची डिग्री तरी खरी आहे का?’ ‘शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार केली तर धमकी मिळते कॉलेज बंद करून टाकेन. याची डिग्री खरी आहे की नाही माहिती नाही असा हा शिक्षणमंत्री.’ अशी टीका त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंवरही केली. ‘बाळासाहेब असते तर त्यांना अशा शिवसैनिकांचा अभिमानच वाटला असता’ ‘विक्रोळीत प्रचारादरम्यान एका महिलेला प्रसुती वेदना झाल्या तर प्रचार सोडून महिलांनी त्या महिलेची प्रसुती पार पाडली. त्या सोडून गेल्या नाहीत. बाळासाहेब असते तर त्यांनाही या अशा शिवसैनिकांचा अभिमान वाटला असता.’ असं उद्धव ठाकरे म्हणाले. ‘… तरी शेपूट हलवत जाता’ ‘नितीन गडकरींचा पीए मोदींनी बदलला त्यांना माहिती नाही. ही तुम्हाला मिळणारी किंमत आणि तरी शेपूट हलवत जाता.’ असंही म्हणत उद्धव ठाकरेंनी गडकरींवरही टीका केली. ‘...म्हणून तो अहवाल घेऊन मी नाचतो आहे’ ‘जनतेच्या पैशांना आम्ही कधी हात लावत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य जनतेसाठी मग त्यांचा पैसा घेऊ कशाला? आमचा पारदर्शक कारभार दाखवण्यासाठी केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल घेऊन मी नाचतो आहे.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. ‘राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नाही!’ ‘सामनाने यांना इतकं बेजार केलं की हे बंदीची मागणी करतात. ही आणीबाणीच आहे.  आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींच्या सरकारचे जनतेने बारा वाजवले होते. इंग्रज सरकारच्या काळात टिळकांनी अग्रलेख लिहला होता. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? मग आम्ही हाच प्रश्न विचारला तर उत्तर देण्याइतपत तरी तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? दुसरा अग्रलेख होता ‘राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नाही!’ संजय राऊतांना सांगतो तो अग्रलेख मिळाला तर उद्या पुन्हा सामनामध्ये होता तसा छापा.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या सामनाबंदीच्या मागणीचा समाचार घेतला. ‘पवारांना पद्मविभूषण, मग अद्यापर्यंत सावरकरांना भारतरत्न का नाही?’ ‘मोदी म्हणतात पवारांचं बोट पकडून मी राजकारण शिकलो. मग देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले की मोदींचं कुठलं बोट पकडणार आहेत? हे सांगावं. शरद पवारांना पद्मविभूषण दिलं. मग आतापर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न का दिलं नाही?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ‘शिवसेनेमुळे दंगलीत मुंबई वाचली’ ‘मुंबईच्या दंगलीत कुठे गेले होते हे सगळे? फडणवीस यांचं वय काय होतं त्यावेळेस? तेव्हा हा शिवसैनिकच धावून गेला होता मुंबई वाचवण्यासाठी. नुसता चर्चा करणाऱ्या गुंडापेक्षा माता भगिनींना वाचवणारा आमचा गुंड बरा.’ असं उद्धव ठाकरे म्हणाले. ‘आता तर हद्द झाली, मातोश्री, ठाकरे कुटुंबावर आरोप होऊ लागले’ ‘आता तर हद्द झाली, मातोश्री, ठाकरे कुटुंबावर आरोप होतात. माझे आजोबा, वडिलांनी करावास भोगला आणि हे आम्हाला मुंबईवरचं प्रेम शिकवणार. हुतात्मा चौकात जाऊन महाराष्ट्रचा लचका पडून देणार नाही ही शपथ घ्या.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधलं. उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे: आज पुण्यातील मुख्यमंत्र्यांची सभा पाहिली, पारदर्शक सभा होती: उद्धव ठाकरे आमची लेना किंवा देना बँक नाही, अशी भरगच्च भरलेली ही आमची बँक, तुमच्यासारख्या रिकाम्या खुर्च्या नाही. तुमची नो अॅक्सेस बँक: उद्धव ठाकरे आमच्यावर हवी ती टीका करा, पण पाटणा म्हणून माझ्या मुंबईची अवहेलना करु नका: उद्धव ठाकरे आरोग्य शिबीरात मुख्यमंत्र्यांचे डोळे तपासणार: उद्धव ठाकरे भाजपची ;ती’ जाहिरात पाहिली, ही कोणती संस्कृती?: उद्धव ठाकरे भाजपला आता ‘चल हट’ म्हणण्याची वेळ आली आहे: उद्धव ठाकरे मुंबईत जोवर शिवसेना आहे तोवर मुबंई सुरक्षित राहणार: उद्धव ठाकरे भिवंडीतील म्हात्रेंच्या मारेकरी अद्यापही मोकाट का?: उद्धव ठाकरे कल्याण-डोंबिवलीला 6500 कोटी देऊ म्हणाले, अजून एकही रुपया दिलेला नाही. :उद्धव ठाकरे फडणवीस फक्त थापा मारत सुटले आहेत: उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेवर एकही रुपयाचं कर्ज नाही, उलट बँकेत ठेवी आहेत त्यावर भाजपचा डोळा: उद्धव ठाकरे जो तुमच्या विरोधात बोलेल त्याला तुम्ही देशद्रोही ठरवणार: उद्धव ठाकरे ‘सामना’ने यांना बेजार केलं आहे. त्यामुळेच बंदीची मागणी, ही आणीबाणी नाही तर काय?: उद्धव ठाकरे ‘राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे!’ हा टिळकांचा अग्रलेख सापडल्यास उद्या सामनामध्ये छापा: उद्धव ठाकरे देशात चांगलं बदल व्हावा यासाठी तुम्हाला निवडून दिलं, पण तुम्ही स्वत:च म्हणतात, देश बदल रहा है!: उद्धव ठाकरे शरद पवारांना पद्मविभूषण देऊ शकतात. मग स्वातंत्र्यवीर सावकरकरांना अद्यापपर्यंत भारतरत्न का नाही?: उद्धव ठाकरे स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या क्रांतीकारकांचं दालन मुंबईत बनवणार: उद्धव ठाकरे यांनी चरख्यावरुन गांधीजींना हटवलं आहेच. त्यामुळे मोदीच देशाचे राष्ट्रपिता होते असं जनतेला वाटेल: उद्धव ठाकरे मोदी स्वत: 10 लाखाचा कोट घालता आणि मनमोहन सिंह यांचं रेनकोट पाहता: उद्धव ठाकरे मी काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा विरोध करणार आणि सत्यासाठी, चांगल्यासाठी भाजपचाही विरोध करणार: उद्धव ठाकरे आम्ही सुद्धा मोदी-मोदी करत होतो. पण विधानसभेच्या वेळेला तुम्ही शेवटपर्यंत आम्हाला घोळवत ठेवलं: उद्धव ठाकरे इतकं वर्ष तुमच्या पाठीशी राहिलो, तुम्ही पाठीत वार करता: उद्धव ठाकरे मातोश्री, ठाकरे कुटुंबावर आरोप करतात. पण विसरु नका अखंड महाराष्ट्रासाठी माझ्या आजोबांनी लढा दिला होता: उद्धव ठाकरे शिवसेनेचा अपमान त्यावेळेला मी सहन केला: उद्धव ठाकरे संबंधित बातम्या: 'राज ठाकरेंनी 5 वर्षात फक्त नकलाच केल्या', नाशकात मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे, हे त्यांनी ध्यानात ठेवावं: अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या सभास्थळी शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी आम्ही केलेल्या विकासकामांचं प्रेझेंटेशन राज ठाकरेंनी केलं: गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांच्या रद्द सभेवरुन शिवसेनेचे तिरकस बाण शरद पवार बेभरवशी : शिवसेना सभेला कोणीच नाही, सभा सोडून मुख्यमंत्री रवाना!  माझ्या पक्षाचं मी बघून घेईन : राज ठाकरे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget