एक्स्प्लोर
गृहखात्याला नवा मंत्री गरजेचा : उद्धव ठाकरे
मुंबई : मुख्यमंत्री सक्षम आहेत, पण गेल्या काही दिवसात त्यांच्यावरचा व्याप खूप वाढला आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्रीपदावर सवाल उपस्थित केला आहे. शिवाय पोलिसांवरचे हल्ले रोखण्यासाठी गृहखात्याला नवा मंत्री देण्याची मागणीही त्यांनी केली.
पोलिसांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांबाबत आज उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी पोलिसांच्या कुटुंबीयांचं प्रतिनिधीमंडळही 'वर्षा' बंगल्यावर उपस्थित होतं.
राज्यातील पोलिसांची सुरक्षितता, कायद्याची योग्य अंमलबजावणी आणि हल्लेखोरांना कठोर शिक्षा, अशा मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मांडल्यांचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
पोलिसांच्या तक्रारीच्या निवारणासाठी एक समिती स्थापन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली असून यात पोलिसांच्या कुटुंबियांचे प्रतिनिधी, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा समावेश असणार आहे.
त्या समितीद्वारे पोलिसांवरील हल्ले, अनुकंपा तत्व, ड्युटीच्या वेळा, पोलिसांचे आरोग्य अशा गोष्टींवर तोडगा काढला जाणार आहे.
दरम्यान कल्याणमध्ये घडलेल्या घटनेबाबतही चौकशीचे आदेश देण्यात आले असून, दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement