एक्स्प्लोर

'मातोश्री'वरील बैठकीत उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेच्या मंत्र्यांची कानउघडणी

मुंबई: 'मातोश्री'वर झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. जिल्हा परिषद प्रचाराला सर्वांनाच जावं लागेल आणि ग्रामीण भागात सभा घ्यावाच लागतील.' अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांना ठणकावलं आहे. नगरपालिका निवडणुकीत शिवसेना मंत्र्यांनी दौरे न केल्यानं उद्धव ठाकरेंनी नाराजीही व्यक्त केल्याचं समजतं आहे. युतीत असो किंवा नसो मंत्र्यांची निवडणुकीसाठी काय तयारी आहे.  याचा आढावाही उद्धव ठाकरे या बैठकीत घेतला. या बैठकीत शिवसेनेचे मंत्री रामदास कदम, सुभाष देसाई, दीपक केसरकर खासदार अनिल देसाई यांच्यासह इतर मंत्री आणि आमदारही हजर होते. दरम्यान, राज्यात भाजपची ताकद वाढली असली तरी युतीमध्ये फूट पडून त्याचा फायदा काँग्रेसला होऊ नये, म्हणून युती गरजेची असल्याचं मत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काल राज्यभरातले पालकमंत्री, जिल्हाध्यक्ष आणि संघटनमंत्र्यांची बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे मत मांडलं. नगरपालिका निवडणुकीत भाजप हा एक क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. पण या निवडणुकीत काँग्रेसही दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. या निवडणुकीत काँग्रेसला फारसा फटका बसलेला नाही. त्यामुळे राज्यातला काँग्रेस पक्ष कमकुवत करायचा असेल, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती आवश्यक असल्याचा विचार मुख्यमंत्र्यांनी मांडल्याचं कळतं. युती तुटली, तर भाजप आणि शिवसेनेच्या संघर्षात काँग्रेसला फायदा होऊ शकतो. त्यामुळे हे टाळण्यासाठी स्थानिक पातळ्यांवर युतीची चर्चा सुरु करण्याचे आदेशही दिले गेल्याचं समजतं. मुंबईत भाजप स्वबळावर लढल्यास भाजपला शंभरहून अधिक जागा मिळतील, असा अंदाज पक्षाने केलेल्या सर्वेक्षणातून बांधण्यात आला आहे. उलट युती केल्यास त्याचा लाभ शिवसेनेला अधिक होण्याची चिन्हं असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे भाजप काय निर्णय घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. भाजपने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात भाजप स्वबळावर लढल्यास शंभरच्या आसपास जागा मिळतील असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अगदी कमीतकमी म्हणजे 85 जागा तरी निश्चित मिळवता येतील, अशी खात्री भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे शिवसेनेशी जागावाटपात नमते घेऊन 100 पर्यंत जागा पदरात पाडून घेण्यापेक्षा सरळ लढत द्यावी, असा भाजपच्या नेत्यांचा कल आहे. दुसरीकडे स्वबळावर लढल्यास प्रचारात शिवसेना-भाजपमधील संबंध कमालीचे बिघडतील. त्यामुळे राज्य सरकारच्या स्थिरतेची मुख्यमंत्री फडणवीस यांना काहीशी चिंता भेडसावत आहे. तरी स्वबळावर लढून निवडणुकांचे निकाल पाहून कल्याण-डोंबिवली प्रमाणे पुढची रणनीती ठरवली जाण्याची शक्यता आहे. संबंधित बातम्या: युतीच्या चर्चेसाठी उद्धव ठाकरेंची सेना मंत्र्यांसोबत तातडीची बैठक ...म्हणून युती गरजेची, खलबतांनंतर मुख्यमंत्र्यांचं स्पष्ट मत

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : टीव्हीवर नेत्यांचा बोलबाला, पण सोशल मीडियावर तुकाराम मुंढेंचीच क्रेझ; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही टाकले मागे
टीव्हीवर नेत्यांचा बोलबाला, पण सोशल मीडियावर तुकाराम मुंढेंचीच क्रेझ; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही टाकले मागे
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
आम्ही रेल्वे फिरू देणार नाही, विमानं उडू देणार नाही; मुंबईत येतच असतो, मुंबईतील आंदोलन बंदीवरुन भडकले जरांगे पाटील
आम्ही रेल्वे फिरू देणार नाही, विमानं उडू देणार नाही; मुंबईत येतच असतो, मुंबईतील आंदोलन बंदीवरुन भडकले जरांगे पाटील

व्हिडीओ

Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं
Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत
Sandeep Deshpande यांनी गणेश मंडळांना फटकारलं, आता गणपतीत फक्त गरबा बघायचा राहिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : वा रे प्रशासन! आदित्य ठाकरेंची पाहणी, बैठक संपून माघारी येण्यापूर्वीच लोटे एमआयडीसीतील खड्डा बुजवला
वा रे प्रशासन! आदित्य ठाकरेंची पाहणी, बैठक संपून माघारी येण्यापूर्वीच लोटे एमआयडीसीतील खड्डा बुजवला
Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
4G Solar Camera For Farm : शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
Tukaram Mundhe : गणेशोत्सवात मंडळांना महाप्रसादासाठी नवा नियम आहे? तुकाराम मुंढे म्हणाले...
गणेशोत्सवात मंडळांना महाप्रसादासाठी नवा नियम आहे? तुकाराम मुंढे म्हणाले...
YouTube Earning Tax : यूट्यूबवरुन होणाऱ्या कमाईवर भारतात किती कर लागतो?  जीएसटी भरावा लागतो का?
यूट्यूबवरुन होणाऱ्या कमाईवर भारतात किती कर लागतो?  जीएसटी भरावा लागतो का?
Embed widget