एक्स्प्लोर
‘त्यांच्या संगानं मुख्यमंत्री बदनाम होत आहेत’, उद्धव ठाकरेंची टीका
सुनील तटकरेंच्या पुस्तक प्रकाशनला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावणं योग्य आहे. या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्या राजकीय वाटचालीच्या त्रिदशकपूर्तीच्या निमित्तानं ‘समग्र’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत. यावरुनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यांनी यावरुन मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केली आहे.
आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला. सुनील तटकरेंच्या पुस्तक प्रकाशनला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावणं योग्य आहे. या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली.
विरोधक असताना सुनील तटकरेंवर घोटाळ्याचे आरोप करणाऱ्या फडणवीस यांनी आता त्यांच्याच कार्यक्रमाला हजेरी लावणं चुकीचं असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर थेट टीका केला आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
पत्रकार : तुम्ही विरोधी पक्षात असताना 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाला होता. त्यासंबंधी सुनील तटकरेंची चौकशी सुरु आहे. पण आता त्यांच्याच पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. हे तुम्हाला योग्य वाटतं का?
उद्धव ठाकरे : ‘हे पुस्तक मला माहित नाही. कारण ते माझ्यापर्यंत आलेलं नाही. पारदर्शक असेल असं वाटतं. म्हणजे वरपासून खालपर्यंत डायरेक्ट टेबलच दिसेल. पुस्तक दिसेल की नाही मला कल्पना नाही. पण आपण त्यांच्यावर काही शिंपडलं म्हणजे ते पवित्र होतात असा जर कुणाचा समज असेल तर तो चुकीचा आहे. त्यांच्या संगानं आपण बदनाम होतो आहोत हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मग तुम्ही आरोप कशासाठी केले होते? असं करा उद्याच्या भाषणात असं सांगा की, आम्ही केलेले आरोप खोटे होते. आम्हाला माफ करा.’दरम्यान, सुनील तटकरे यांचा पुस्तक प्रकाशन सोहळा 9 ऑक्टोबरला मुंबईत होणार असून याला अनेक बडे नेते हजेरी लावणार आहेत. मात्र, आता उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. VIDEO :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement