एक्स्प्लोर
मतदारांसाठी उबर टॅक्सीकडून खास सूट!
मुंबई: मतदान केंद्र तुमच्या घरापासून लांब असेल तर मतदानाच्या दिवशी तुम्ही उबर टॅक्सी बुक करू शकता. कारण मतदानाच्या दिवशी उबर टॅक्सीकडून ग्राहकांना थेट 50 रुपयांची सवलत दिली जाणार आहे.
मतदानाला जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदानासाठी घराबाहेर पडावं यासाठी उबर टॅक्सीनं ही अनोखी योजना जाहीर केली आहे.
दरम्यान, काल पुण्यातही मतदारांसाठी अशाच काही योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. 21 फेब्रुवारीला मतदान करणाऱ्या मतदारांना पुण्यातील मल्टीप्लेक्समध्ये सिनेमांच्या तिकीटात 15 टक्के सूट देण्यात येणार आहे. तर दुसरी हॉटेल असोसिएशननंही असाच एक निर्णय घेतला आहे.
मतदारांना 21 फेब्रुवारीला हॉटेलमध्ये मिष्टान्न (डेझर्ट) देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं असं आवाहन मल्टीप्लेक्स आणि हॉटेल असोसिएशन केलं आहे. तेव्हा 21 तारखेला फक्त सुट्टी एन्जॉय करू नका, तर आवर्जून मतदान करा.
संबंधित बातम्या:
मतदान करा, मल्टीप्लेक्सच्या तिकीटात सूट मिळवा!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement